#स्पर्धापरीक्षा - बुद्धिबळ : कार्लसनची जगज्जेतेपदाची हॅट्ट्रीक

ज्ञानेश भुरे 
गुरुवार, 8 जून 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करून नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन 2013मध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाला. यानंतर 2014मध्ये पुन्हा आनंदला पराभूत करून कार्लसनने जगज्जेतेपद राखले. यानंतर 2016मध्ये त्याने सर्जी कार्जाकिनला पराभूत करून जगज्जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी कार्लसन बुद्धिबळाच्या जगात नंबर वन बनला होता. तेदेखील 2000, 2007, 2008, 2010,2012 असं पाचवेळा विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करून. विशेष म्हणजे आनंदच्या चुकांमुळे हे विश्वविजेतेपद आपल्याला मिळाले नाही. किंवा केवळ नशिबाचा भाग म्हणून ते आपल्याला मिळाले नाही, हे कार्लसनने पुढच्या वर्षी दाखवून दिले. पुन्हा एकदा तो चौसष्ठ घरांचा राजा झाला होता. आनंदची मक्तेदारी त्याने मोडून काढली होती. आनंद आणि जगज्जेतेपद हे जणू काही समीकरणच होऊन बसले होते. मात्र, दोन वेळा कार्लसनने आनंदला किताबी लढतीत पराभूत केले होते. अर्थात खेळात हार-जीत असली तरी यामागे कार्लसनची मेहनत होती, हे विसरून चालणार नाही. 

बुद्धिबळ हा त्याचा श्वास आहे. याची चुणूक त्याच्या लहानपणीच आली होती. कार्लसनचा जन्म टोन्सबर्ग येथे 30 नोव्हेंबर 1990 नोव्हेंबर मध्ये झाला. कार्लसनचे आई-वडील दोन्ही इंजिनिअर. वयाच्या दुसऱ्याच वर्षी मॅग्नसनने 50 पीसचे जीगसॉ पझल सोडवण्याचा पराक्रम केला होता. मॅग्नसनचा प्रवास खरे तर या पझलमधून सुरू झाला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या चाणाक्ष मुलाने बुद्धिबळाचे प्राथमिक धडे आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखालीच गिरवले. तेदेखील वयाच्या पाचव्या वर्षी. या वयात जिथे मुलांना व्यवस्थित दहापर्यंत आकडे मोजता येत नाहीत, तिथे हा 
मुलगा बुद्धिबळाच्या चाली आत्मसात करत होता. म्हणूनच तिसऱ्यांदा जेव्हा कार्लसन जगज्जेता झाला तेव्हा सर्वप्रथम त्याने त्याच्या वडिलांचे आभार मानले. कारण त्याच्यातील बुद्धिमत्तेला त्यांनीच योग्य वळण लावले होते. केवळ जिंकण्यासाठीच खेळायचे असा कार्लसनचा ध्यास आहे. तुमच्या जिंकण्याला महत्त्व आहे. तुम्ही हारला तर कितीही कारणे दिली, तर त्याला महत्त्व नसते, हा बॉबी फिशरचा संदेश अजूनही कार्लसन पाळतो. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना

#स्पर्धापरीक्षा - अलिप्ततावादी चळवळीविषयी

#स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016

#स्पर्धापरीक्षा - गुगल प्रोजेक्ट लून

#स्पर्धापरीक्षा -'स्टॅंड अप इंडिया' योजना

#स्पर्धापरीक्षा - बौद्धिक संपदा हक्क धोरण

#स्पर्धापरीक्षा - 'कृषी विज्ञान केंद्र ज्ञान तंत्र' पोर्टल