आज दिवसभरात... (ई सकाळ व्हिडिओ बुलेटिन)

टीम ई सकाळ
गुरुवार, 15 जून 2017

राज्यभरात घडलेल्या विविध घडामोडींचा व्हिडिओजच्या माध्यमातून घेतलेला आढावा 

दिवसभरातील राज्यातील विविध घडामोडी संबंधीत व्हिडिओ बुलेटिन

राष्ट्रपती भवनात 8 वर्षे शेफ म्हणून काम केलेले माजी एक्झिक्युटीव्ह शेफ मच्छिंद्र कस्तुरे यांच्याशी फेसबूक लाईव्हद्वारे संवाद...

शाळेचा पहिला दिवस...
मुलींची पहिली शाळा सुरु करणाऱ्या सावित्रीबाई फूले आणि महात्मा फुले यांना वंदन करून आज पुण्यात लक्ष्मी रोड जवळील हुजूरपागा शाळेतील विद्यार्थीनींनी शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा केला. 

शाळेचा पहिला दिवस...
पुण्यात कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई स्मृति पुरस्कार वितरण सोहळ्यात महापौर मुक्ता टिळक यांनी मनोगत व्यक्त केले. लक्ष्मी रस्त्याचे नामकरण लक्ष्मीबाई हलवाई पथ असे करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

शाळेचा पहिला दिवस...
सातारा : जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये अाज (गुरुवार) पहिल्या दिवशी चिमुकल्यांचे ढाेल ताशांच्या निनादात स्वागत झाले. वर्गात गेल्यानंतर मिकी माऊस, टेडी ही साेबतीला हाेतीच पण अाई-बाबांच्या अाठवणींमुळे काहींना रडू काेसळत हाेते तर काहींनी डब्यावर ताव मारला. 

सातारा : खंडाळा घाटातील मुसळधार पावसानंतरचे दृश्‍य

कोल्हापूर : येथील नेहरू नगर विद्यालयातील शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस...
आज पहिल्यांदाच शाळेत गेलेल्या या बाळगोपाळांच्या चेहऱ्यावरील भाव टिपले आहेत पुणे महापालिकेच्या एका शाळेत...

टॅग्स