SakalForMaharashtra responses of dignitaries for Come together
SakalForMaharashtra responses of dignitaries for Come together

#SakalForMaharashtra 'एकत्र येऊया... मान्यवरांच्या प्रतिक्रिया

पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-महिलांच्या उत्थानासाठी समाजातील सेवाभावी व्यक्‍ती व संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

आंदोलनात सामन्य माणूस भरडला जातो
औद्योगीक क्षेत्रात काम करत असताना देशाच्या काना कोपऱ्यातुन येणाऱ्या कामगारांच्या वेगवेगळ्या व्यथा जेव्हा एकायला मिळतात त्या वेळेला नेहमीच मन व्यथित होते. त्या वेळेला जाणिव होते ति कारखानदार म्हणुन यशस्वी होत असताना आपणही समाजाच काही देण लागतो. कोणत्याही आंदोलना सर्वात जास्त भरडला जातो तो सामान्य माणुसच आणी आंदोलन करणारेही सामान्य वर्गाचेच असतात. अशा वेळेला स्वतःच्या माणसाचे नुकसान करणाऱ्या व्यक्तिसमुहांच्या हातात दगड बघायचे नसतील तर त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावाच लागेल. बदलत्या काळात ही रोजगार निर्मितीची जवाबदारी केवळ सरकारवर ढकलून जाणार नाही. काम मागणाऱ्यापेक्षा काम देणारे हात निर्माण झाले तर समाजस्वास्थ सुदृढ झाल्याशिवाय रहाणार नाही. 'सकाळ'चा हा उपक्रम म्हणुनच केवळ रोजगारनिर्मितीचं माध्यम नाही तर समाजसेवाही आहे. 'सकाळ'च्या उपक्रमात योगदान देण्याची माझी तयारी आहे.

-सतिश शेट्टी अध्यक्ष तळोजा इन्डस्ट्रीज असोशीयन

तरुणाईला प्रत्येक क्षेत्र घडवावे लागेल
महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर आहे. त्याला घडवण्यासाठी प्रत्येक  समाज घटकांनी पुढे येणे आवश्यक आहे. विशेषता  तरूणाईला प्रत्येक क्षेत्रात घडवावे लागेल. सकाळने त्यासाठी घेतलेला पुढाकार नक्कीच स्तुत्य आहे. मी त्यासाठी मदत करण्यास तयार आहे.
-सुधाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते उरण

आपल्यापासून सुरूवात करणे आवश्यक
आपल्याकडे अनेक योजना आहेत, त्या प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. दुसरा काय करतो यापेक्षा आपल्यापासून सुरुवात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर शालेय वयातच सामाजिक बांधिलकीचे संस्कार करणे गरजेचे आहे. 

-मेधा कुलकर्णी, मुख्याध्यापिका, ओक हायस्कूल

कौतुकास्पद उपक्रम
रोजगार वृद्धीसाठी नवनव्या योजना येतात, पण त्यातील किचकट अटींची पुर्तता करणे सामान्य कुटुंबातील तरुणांना शक्य होत नाहीत. बँकाही यामध्ये हेवेदावे दाखवत असताना 'सकाळ'चा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे.

- आमदार पंडित (सुभाष) पाटील, अलिबाग-मुरुड विधानसभा सदस्य

नवउद्योजकांना मदतीचा हात देण्याची गरज
शासकीय योजनांचा लाभ घेतना त्यातील नियम, निकष, अटी-शर्तीमुळे गरीब कुटुंबातील होतकरु तरुण वंचित राहतात. त्यामुळे 90 टक्के चांगली गुणवत्ता असलेले तरुणा अडगळीत पडतात. अशा नवउद्योजकांना मदतीचा हात देण्याची गरज होती.

- योगेश मगर, चेअरमन सहयोग नागरी पतसंस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com