"नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा' त सांगलीची पायल पांडेची निवड 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

सांगली - नवी दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रॉमात येथील पायल अमर पांडे हिची निवड झाली आहे. नाट्यपंढरी सांगलीच्या इतिहासात या राष्ट्रीय स्तरावरील नाट्यसंस्थेत निवड झालेली पायल पहिली महिला आहे. यापूर्वी 70 च्या दशकात ज्येष्ठ नाट्यकर्मी यशवंत केळकर यांची निवड झाली होती. 

सांगली - नवी दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रॉमात येथील पायल अमर पांडे हिची निवड झाली आहे. नाट्यपंढरी सांगलीच्या इतिहासात या राष्ट्रीय स्तरावरील नाट्यसंस्थेत निवड झालेली पायल पहिली महिला आहे. यापूर्वी 70 च्या दशकात ज्येष्ठ नाट्यकर्मी यशवंत केळकर यांची निवड झाली होती. 

भारतीय नाट्यकलेच्या क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या अनेक कलावंतांनी एनएसडीएमध्ये धडे गिरवले आहेत. नसिरुद्दीन शहा, इरफान खान, ओमपुरी, अनुपम खेर, अतुल कुलकर्णी, रोहिणी हटगंडी असे दिग्गज या संस्थेचा वारसा सांगतात. केंद्राच्या सांस्कृतिक खात्यांतर्गत ही संस्था काम करते. पदवीनंतर या संस्थेत प्रवेश दिला जातो. तत्पुर्वी देशातील सात प्राथमिक केंद्रावर दहा हजारांवर कलावंताची प्राथमिक फेरीत निवड होते. प्रत्येक केंद्रावरील अशा निवडक 143 जणांचे दिल्लीत पाच दिवसाचे शिबिर झाले. नाट्यकलेतील विविध गुणांचे प्रत्यक्ष अत्युत्तम दर्शन घडवणाऱ्या 26 जणांची अंतिम निवड झाली. त्यात पायलची निवड झाली. 

सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातून तिने बीए केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातून तीने पदवी प्राप्त करताना तिसरा क्रमांक मिळवला. या शैक्षणिक प्रवासादरम्यान अभिनयाचा प्रवास मात्र पाचवीपासून बालकलाकार म्हणून सुरु झाला. राज्य नाट्यस्पर्धेत तीने आजवर पारध (2012), फेंन्डशिप (2013), डार्कमॅटर (2014), वारुळ (2015), नथींग टू से (2016) अशा नाटकांत काम करताना अभिनयाची प्रमाणपत्रे मिळवली. पुरषोत्तम करंडक स्पर्धेतही तिने सर्वोत्कृष्ट अभिनयाचे नैपुण्य पारितोषिक मिळवले. राज्यभरातील विविध एकांकिका स्पर्धात तिने 30 हून अधिक पारितोषिके मिळवलति. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दशक्रिया चित्रपटात तीने छोटी भूमिका केली आहे. 

""बालनाट्यामधून मी रंगभूमीवर आले. या क्षेत्रात मी यावे यासाठी दिग्दर्शक प्रताप सोनाळे, वडील प्राचार्य अमर पांडे, आई शैलजा यांनी प्रोत्साहन दिले. सांगलीतील अनेक ज्येष्ठांचा या यशात वाटा आहे. पुढील तीन वर्षे मी दिल्लीत असेन. तेथे नाट्यपंढरीचा लौकीक वाढवणारी कामगिरी करेन. अभिनय हेच माझे आवडीचे क्षेत्र आहे. '' 
-पायल पांडे