भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत राऊतांचं महत्वाचं वक्तव्य

कालच्या सभेत पतंप्रधांनांनी कोरोनासंदर्भातील विषयावर बोलणे अपेक्षित होते, मात्र..
Sanjay Raut on Nagpur Visit
Sanjay Raut on Nagpur Visit e sakal
Summary

कालच्या सभेत पतंप्रधांनांनी कोरोनासंदर्भातील विषयावर बोलणे अपेक्षित होते, मात्र..

काल पंतप्रधान मोदी यांनी एकतर्फी संवाद साधला आहे. कालच्या सभेत पतंप्रधांनांनी कोरोनासंदर्भातील विषयावर बोलणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी इतर विषयांवर भाष्य केलं. कोविडच्या विषयावरून त्यांनी थेट पेट्रोल-डिझेल दरवाढीवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींकडून ही अपेक्षा नव्हती, असा टोमणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. याशिवया भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीबाबत अफवा असून तेव्हा काय होणार हे मला माहिती आहे आणि उद्या काय होणार हेही मला माहिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Sanjay Raut on Nagpur Visit
कोरोना व्हेरियंटमुळे चिंता वाढणार?, WHOकडून सावधगिरीचा इशारा

कालच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधान मोदींवर राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी कडून ही अपेक्षा नव्हती. कोरोना सोडून इतर विषयांवर पंतप्रधानांनी तारा छेडल्या आहेत. मोदी कोरोना संदर्भात मार्गदर्शन करणार होते. पण त्यांनी इंधनदरवाढीच्या विषयावर संवाद साधला. या बैठकीत मोदींनी बिगर भाजप सरकारला टोमणे मारण्याचं काम जास्त केलं. बिगर भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सरकारकडे मागणी आहे, त्यामुळे मराठी बाण्याला जागून मुख्यमंत्र्यांनी मोदींना उत्तर दिले आहे. भाजपचे मुख्यमंत्री नसलेल्या राज्यांबद्दल मोदींची वेगळी भूमिका असणं हे योग्य नाही, असंही राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं.

युसुफ लकाडावाला आणि महाविकास आघाडी नेत्यांच्या फोटोंसंदर्भात विचारेल असता राऊत म्हणाले, मोबाईल आणि डिजिटल युगात कोणाचाही फोटो कुणाहीसोबत निघू शकतो. लकडावालाचे फोटो कुणासोबत आहेत यापेक्षा त्याने कुणाशी व्यवहार केले हे महत्वाचं आहे. लवकरच मुंबईत शिवसेनेची सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे अफवांवर लक्ष देऊ नये. भाजप शिवसेवा आणि राष्ट्रवादीची युती होणार ही अफवा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Sanjay Raut on Nagpur Visit
मनसेकडून शरयूकाठी होणार शक्तीप्रदर्शन; अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com