Sanjay Raut: राऊतांना राणेपुत्रांचे खोचक टीकेने प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या भाषेवर प्रत्युत्तर देताना या दोघांनी सडकून टीका केला आहे.
Sanjay Raut Press Conference
Sanjay Raut Press ConferenceTeam eSakal

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay Raut Press Conference) यांनी मुंबईतील शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये संजय राऊत यांनी अनेक विरोधकांवर सडकून टिका केली. त्याचबरोबर त्यांनी भाजपाचे किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासह अनेकांवर टीका केली. या पत्रकार परिषदेवर विरोधकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) व आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत वापरलेल्या भाषेवर प्रत्युत्तर देताना निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हटलंय की, ''आज संज्याने जी भाषा वापरली आहे ती महाराष्ट्राच्या कुठल्या संस्कृतीत बसते ते शिवसेनेने सांगावे. तिथे महिला पत्रकारही होत्या, त्यांच्यासमोर ही भाषा वापरणे योग्य आहे का? त्याच पत्रकारांपैकी एका महिला पत्रकाराने संजयच्या विरोधात तक्रार करावी नाहीतर हा सुधारणार नाही.'' अशा शब्दांत निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

त्याचबरोबर नितेश राणे यांनीसुद्धा संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी म्हटलंय की, चाटायचं असेल तेव्हा पवार साहेब, चावायचं असेल तेव्हा बाळासाहेब याला म्हणतात लोंबत्या राऊत. अशा शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली आहे.

त्याचबरोबर अनेक विरोधक नेत्यांनी टीका केली आहे. निलेश राणे यांनी एक मीम व्हायरल केले आहे, त्यामध्ये पत्रकार परिषदेच्या अगोदरचा वाघ आणि नंतरचा वाघ अशी तुलना करत आजच्या पत्रकार परिषदेची वस्तूस्थिती अशा शब्दांत ट्वीट केलं आहे. त्यामध्ये परिषदे अगोदर वाघ दाखवला आहे आणि नंतर कुत्रा दाखवत टीका केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com