CM ठाकरेंची विराट सभा पाहून विरोधकांची बुबुळं बाहेर आली - राऊत

काश्मीर पंडितांविषयी शिवसेनेनं भूमिका घेतल्यानं विरोधाकांच्या पोटात दुखतंय
Sanjay Raut on Uddhav Thackeray Speech | Sanjay Raut News
Sanjay Raut on Uddhav Thackeray Speech | Sanjay Raut News
Summary

काश्मीर पंडितांविषयी शिवसेनेनं भूमिका घेतल्यानं विरोधाकांच्या पोटात दुखतंय

काश्मीर पंडितांविषयी शिवसेनेनं भूमिका घेतली आहे. यामुळे विरोधाकांच्या पोटात दुखत आहे. केवळ विरोधासाठी विरोध हा भाजपचा अजेंडा आहे. काल औरंगाबाद येथे झालेली मुख्यमंत्र्यांची विराट सभा पाहून विरोधकांची बुबुळं बाहेर आली आहेत, असा सणसणीत टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. (Sanjay Raut Latest political News)

काल मुख्यमंत्री ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा झाली. या सभेतील उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यासंदर्भात विचारले असता राऊत म्हणाले, सातत्याने टीक करणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार घेतला गेला आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य आहे. कारण मुख्यमंत्र्यांची कालची सभा ही मराठवाड्यातील जनतेसाठी होती. त्यामध्ये कोणतही राजकारण नव्हतं.

Sanjay Raut on Uddhav Thackeray Speech | Sanjay Raut News
पुण्यात ५० पेक्षा अधिक वाहनांची तोडफोड, पर्वती परिसरातील घटना

भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली आहे. यावर राऊत म्हणाले, मुंडे-महाजन यांच्याविरुद्ध पडद्यामागे षड्यंत्र सुरू आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हे भाजपाच्या हातात असून हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भाजप-शिवसेना युती असताना या दोन नेत्यांमुळे युतीला बळ मिळाल होतं. दोन महत्वाच्या नेत्यांपैकी गोपिनाथ मुंडे हे लोकनेते होते. पंकजा मुंडेही वडिलांप्रमाणे बहुजन समाजाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर पडसाद उमटले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातून मुंडे-महाजन ही नावं वगळण्याचा प्रयत्न करत असल्याची शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी काल ट्विट केलं आहे की काल मुख्यमंत्र्यांची टोमणे सभा झाली. यावर प्रतिक्रिय देताना राऊत म्हणाले की, ते कोरोनामुळे आजारी आहेत. कोरोनामुळे त्यांचा आजार वाढला आहे का? त्यांनी मुख्यमंत्र्यांच भाषण काळजीपूर्वक ऐकलं असले तर लक्षात येईल अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर त्यांनी केंद्र सरकार समोर सवाल उपस्थित केले आहेत. केंद्राला राष्ट्रीय प्रश्न विचारण हे टोमणे आहेत का? असा सवालही त्यांनी फडणवीस यांना केला आहे.

Sanjay Raut on Uddhav Thackeray Speech | Sanjay Raut News
खासदार राणांच्या निशाण्यावर CM ठाकरे म्हणाल्या, भाषण ठोकण्यापेक्षा..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com