विरोधकांचं तोंड नसून गटार, राऊतांचा मनसेला सणसणीत टोला

विरोधकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो ऍलर्जी आहे का?, राऊतांचा सवाल
sanjay raut latest political news
sanjay raut latest political news e sakal
Summary

विरोधकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो ऍलर्जी आहे का?, राऊतांचा सवाल

राज्यातील राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज संभाजीनगर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, या सभेवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यासह भाजपाने पोस्टर वॉर करत शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. विरोधकांचं तोंड नसून गटार आहे. ते काहीही बोलत असतात त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचे नसते, असा टोला खासदार राऊतांनी लगावला आहे. (sanjay raut latest political news)

आज मुबंईत बोलत असताना त्यांनी संभाजीनगर सभेसंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, आज मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी लाखो शिवसैनिक येणार आहेत, ही सभा भव्य होणार आहे, असा आम्हाला विश्वास आहे. राज्यातील प्रत्येक घटक पक्ष हा महाविकासआघाडी सोबत आहे असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या सभेसाठी अजूनही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सेनेकडून लावला जातो या मनसेच्या टीकेवर राऊत म्हणाले की, बाळासाहेब यांचा फोटो नाही लावायचा तर मग कुणाचा लावावा. विरोधकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो ऍलर्जी आहे का? सुरुवातीच्या काळात मनसेही बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो लावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

sanjay raut latest political news
'संभाजीनगरमध्ये आज CM ठाकरे तोफ धडाडणार, लवंगी वाजली तरी पुरे'

पुढे ते म्हणाले, राज्यमंत्री बच्चू कडूंसह अनेक मित्रपक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर नाराज आहेत. या घटक पक्षांची नाराजी दूर करण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे. हितेंद्र ठाकूर हे आमच्यासोबत आहेत त्यांचे आमच्याशी चांगले ऋणानुबंध आहेत. ते आणि त्यांचे सहकारी आमच्या परिवारातले आहेत. ते मनमोकळे नेते आहेत त्यांच्याशी संवाद सुरु असल्याचेही ते म्हणाले. औरंगाबादच्या नामांतराविषयी ते म्हणाले, नामांतराचा मुद्दा हा एक सरकारी निर्णय असतो त्यावर मी बोलणार नाही.

ते म्हणाले, सुभाष देसाई, दिवाकर रावते हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. मागील कित्येक वर्षांपासून त्यांनी पक्षाचे कार्य जबाबदारीने सांभाळले आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य पक्षसाठी आणि पक्षवाढीसाठी वेचले आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीत काही बोलणं योग्य नाही. पक्षाचे काही निर्णय असतात त्यावरून पुढे जावे लागते. मात्र पक्ष वाढीमध्ये त्यांची भूमिका मोठी असल्याने पक्ष त्यांनी दुसरी जबाबदारी सोपवू शकते, असंही राऊतांनी सांगितलं आहे.

sanjay raut latest political news
रणनीती ठरलीये, राज्यसभेचा गुलाल महाडिकच उधळणार, गिरीश महाजनांचा दावा

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार या शहराचे नाव खरंच संभाजीनगर ( Sambhaji Nagar ) करणार का? त्याची घोषणा करणार का? पाण्याचा प्रश्न सोडवणार का? अशा अनेक मुद्द्यांची औरंगाबादच्या नागरिकांनाही प्रतीक्षा आहे. या सभेआधी भाजपने शिवसेनेच्या या सभेविरोधात पोस्टरबाजी सुरु केली आहे. 'उत्तर मागतोय संभाजीनगर' अशा पद्धतीने बॅनरबाजी करून भाजपने शिवसेनेला डिचवलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com