sarkarnama.in : विशेष बातम्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

संघर्ष यात्रा होताच शेतकऱ्यांवर खटले
विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांच्या जमिनी एकतर्फी संपादनाच्या विरोधात तीव्र आंदोलनाची घोषणा झाली. मात्र संघर्ष यात्रा जिल्ह्याबाहेर रवाना होताच पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दडपशाही सुरु केली आहे. शिवडे (ता. सिन्नर) येथे विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चॅप्टर केस दाखल करण्याच्या नोटीस देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. 

 पुर्ण बातमी इथे वाचा 

आमदार निवास बलात्कार प्रकरणी महिला आमदारांचा निषेध
नागपूर येथील आमदार निवासस्थानी एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. हि मुलगी एका ज्वेलर्सच्या दुकानात करत असून तिच्या सहकाऱ्यांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आलेले आहे.

 पुर्ण बातमी इथे वाचा

आमदार निवास' देहव्यापाराचा अड्डा?
नागपुरातील आमदार निवास देहव्यापाराचा अड्डा झाला काय? असा प्रश्‍न आता नागपुरातील आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरण उघडकीस आल्याने समोर आला आहे. 

 पुर्ण बातमी इथे वाचा

मंत्री बडोले, सावरा आणि लोणीकरांचा होणार पत्ता कट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर घेतलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा पत्ता कट होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 पुर्ण बातमी इथे वाचा

विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामुळे आमदारांचा ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर
जीएसटीच्या विधेयकाला मंजुरी देण्याच्या अनुषंगाने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यात बोलविण्याचा तत्वत:  निर्णय झाला आहे. त्यामुळे याच कालावधीत आमदारांसाठी निश्चित केलेला ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर टाकण्यात येणार आहे.

 पुर्ण बातमी इथे वाचा

सरकारनामा ट्विटर

 

 

 

टॅग्स