sarkarnama.in : विशेष बातम्या

Sarkarnama
मंगळवार, 9 मे 2017

sarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील. 

नयना पुजारी खून प्रकरण- तिघाही नराधमांना फाशीची शिक्षा
पुण्यातील साॅफ्टवेअर इंजिनिअर नयना पुजारी हिच्या खून प्रकरणात पुण्यातील न्यायालयाने तिघाही आरोपींना विशेष न्यायाधीश एल.एल येनकर यांनी फाशीची शिक्षा आज सुनावली. या तिघांनाही काल दोषी ठरविण्यात आले होते.

महसूलमंत्र्यांचे कोळीगीत अन्‌ बालमित्रांचा जल्लोष!
टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली...तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो... असा सूर आज (मंगळवार) राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छेडला अन्‌ त्या तालावर बालमित्रांनी अक्षरशः जल्लोष साजरा केला.

 लोकसभेबरोबर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक !
उत्तर प्रदेशातील निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून, लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका घेण्याबाबतचा विचार भाजपच्या प्रदेश नेते करू लागले आहेत.

जीएसटीप्रकरणी भाजप शिवसेनेसमोर शरण
मुंबई महापालिकेला दरमहा करापोटी 8 टक्के रक्कम देण्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनुकूलता दर्शवली आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्यानंतर शिवसेनेचा विरोध मावळल्याचे समजते. 

लातूरकरांच्या समस्येला रेल्वेकडून बगलच !
वर्षामागून वर्ष सरतात तरी रेल्वेचे प्रश्‍न मार्गी लागत नाहीत. त्यात जर विषय मराठवाडा किंवा महाराष्ट्राचा असेल तर रेल्वेत उच्च पदावर बसलेल्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र व मराठवाडा द्वेष उफाळून येतो.

साताऱ्यात लोकसभेची गणिते जुळविण्यासाठी  पवारांची चाचपणी
लोकसभेसाठी सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार कोण असावा, याची चाचपणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी साताऱ्यातील दौऱ्यात केली.

 

सरकारनामा ट्विटर

 

Web Title: sarkarnama news bulletin

टॅग्स