मानसिक आजारासाठी राज्यात सॅटेलाइट केंद्र

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - बंगळूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ (निमहान्स) या संस्थेचे सॅटेलाइट केंद्र महाराष्ट्रातील एका मानसिक रुग्णालयात सुरू करण्यात येईल. यासाठी या राष्ट्रीय संस्थेने सल्लागार म्हणून काम करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले.

बंगळूर येथील मानसिक आजारासंबंधीच्या राष्ट्रीय संस्थेस आरोग्यमंत्र्यांनी भेट दिली. या भेटीनंतर माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, की देशात मानसिक आजारासंबंधी संशोधन करणारी ही एकमेव संस्था आहे. मानसिक स्वास्थ्यासंबंधी वाढत असलेले आजार व जागृती विचारात घेता महाराष्ट्रातही या संस्थेचे सॅटेलाइट केंद्र सुरू करण्याबाबत राज्य शासन विचार करीत आहे. महाराष्ट्रात या संस्थेचे सॅटेलाइट केंद्र सुरू झाल्यास महाराष्ट्रानजीकच्या गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांनाही फायदा होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात मेमरी क्‍लिनिक सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Satellite Centers in the State for Mental Illness