शाळकरी मुले  ‘कुत्ता’ची शिकार

शाळकरी मुले  ‘कुत्ता’ची शिकार

मुंबई - सध्या महाराष्ट्रात मद्यपानाला पर्याय म्हणून नायट्रोझिपाम, अल्प्रोझोलम या गोळ्यांसह कोरॅक्‍स, फेन्सिंड्रील, मिंलिंटक कोडीन ही औषधे मोठ्या प्रमाणात तरुणांकडून सेवन केली जात असतानाच, शाळकरी मुलेही विविध औषधांचा नशा करण्यासाठी वापर करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

दहा ते अठरा वयोगटातील बालके, शाळकरी मुले चक्क स्टिकफास्ट, बाँड, फेविक्विक या ॲडेसिव्हचा नशेसाठी वापर करत असल्याचे दिसून आले आहे. झोपेच्या गोळ्या आणि कोरेक्‍ससारख्या औषधांची विक्रमी विक्री होत असल्याने आता हा चिंतेचा विषय बनला असून, अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घेतली आहे. मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी (ता. १२) या संदर्भात मंत्रालयात बैठक घेत या नव्या आव्हानाचा तातडीने बंदोबस्त करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. परप्रांतातून महाराष्ट्रात येणाऱ्या अल्प्रोझोलम या झोपेच्या गोळ्यांना नशेकऱ्यांनी आणि विक्रेत्यांनी ‘कुत्ता गोळी’ असे सांकेतिक नाव ठेवले आहे. पोस्टर, बॅनर व फ्लेक्‍स चिकटविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बाँडचा नशेसाठी शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. प्लॅस्टिक कागदावर बाँड, स्टिकफास्ट, फेविक्विक या ॲडेसिव्हची मात्रा टाकून मुले त्याचा वास घेतात, या वासातून झिंग येऊन नशा चढते. काही मुले बोटाच्या आकाराच्या बाटलीमध्ये बाँड टाकून त्याचा वास घशात ओढतात व त्या नशेत धुंद राहतात. अलीकडे काही शाळकरी मुले वेदनाशामक आयोडेक्‍सचा वास घेऊन नशा करतात, तर काही जण सॉसप्रमाणे आयोडेक्‍स ब्रेडला लावून खातात.

महाराष्ट्रातील निरागस बालकांना वैयक्तिक स्वार्थासाठी व्यसनाच्या खाईत लोटून त्यांचे बालपण हिरावणाऱ्या संधीसाधू प्रवृत्तीला प्रशासनाने ठेचून काढत सामाजिक आरोग्य धोक्‍यात आणणाऱ्या गल्लाभरूंच्या वेळीच मुसक्‍या आवळणे आवश्‍यक आहे. 
- रवींद्रकुमार जाधव, बालमानस व सामाजिक समस्या विश्‍लेषक

परराज्यांतून महाराष्ट्रात छुपी विक्री
‘कुत्ता’ नावाने परिचित व मुलांमध्ये लोकप्रिय झालेली ही नशेची गोळी गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात छुप्या मार्गाने विक्रीला आणली जाते. या गोळीची व ॲडेसिव्ह बाँडची किंमत २५ ते ६० रुपये, तर झिंग आणणाऱ्या नशिल्या लिक्विड औषधाची किंमत ८० ते १०० रुपये इतकी आहे. कमी किमतीत नशा होत असल्याने या अमली पदार्थांचा ट्रेंड राज्यातील सीमावर्ती नंदुरबार, धुळे, मालेगाव, नाशिक, पालघर, ठाणे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती आदी मध्यम व छोट्या शहरातील झोपडपट्टी भागात जोरात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com