दप्तरात दारूचे 'ओझे'; अकोल्यात घडतोय 'रईस'

योगेश फरपट / प्रवीण खेते
गुरुवार, 11 मे 2017

अकोला : पुस्तके ही सरस्वती असून, दप्तराला मंदीर मानले जाते. पण हल्ली शहरात दारुच्या अवैध विक्रीसाठी विद्यार्थ्यांचे दप्तर वापरले जात आहे. शहरातील गौरक्षणरोड भागात दुपारी एक चिमुकली पुस्तकांऐवजी दारूचे 'ओझे' वाहून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार 'सकाळ'च्या स्पेशल रिपोर्टमध्ये उघडकीस आला. 

अकोला : पुस्तके ही सरस्वती असून, दप्तराला मंदीर मानले जाते. पण हल्ली शहरात दारुच्या अवैध विक्रीसाठी विद्यार्थ्यांचे दप्तर वापरले जात आहे. शहरातील गौरक्षणरोड भागात दुपारी एक चिमुकली पुस्तकांऐवजी दारूचे 'ओझे' वाहून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार 'सकाळ'च्या स्पेशल रिपोर्टमध्ये उघडकीस आला. 

एकीकडे दारूबंदीसाठी व मुलीच्या उज्वल भवितव्यासाठी विविध योजना सरकार राबवित असताना हा प्रकार शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखाच होय. ही घटना म्हणजे 'रईस' या हिंदी चित्रपटातील 'शाहरुख'च्या भुमिकेची आठवण करुन देते. महामार्गावरील दारू विक्रेचे व्यवसाय बंद झाल्यापासून, तळीरामांचे वारे गौरक्षण रोडकडे वाहू लागले आहे. दारू विक्रीचे प्रतिष्ठाणे याच मार्गावर स्थलांतरीत झाले आहेत. याभागात दारू ढोसलण्यासाठी येणाऱ्या तळीरामांनी नागरिकांचे जीणे हैराण करून सोडले आहे. शहरात इतरत्र दारू मिळत नाही म्हणून याठिकाणाहून दारू घेवून जाण्यासाठी मुलांचा वापर केला जात आहे. अशा घटनांकडे मात्र पोलिस व अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष आहे. 

दारू नेण्यासाठी मुलगी व दप्तराचा वापर 
मिळालेल्या गोपनिय माहितीवरून 'सकाळ'चमू गत दोन ते तीन दिवसांपासून या प्रकारावर लक्ष ठेवून होती. यादरम्यान चक्क एका ते वर्षाच्या मुलीचा वापर दारुच्या अवैध विक्रीसाठी करतांना दिसून आला. एक व्यक्ती त्याची पत्नी व 'ती' नामांकीत वाईन बारच्या खाली बराच वेळ थांबली. महिलेला व मुलीला एका बाजूला उभे करून, त्या व्यक्तीने वाईन बारमधून दारूच्या बाटल्या आणल्या. त्या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्याकडील दारूच्या बाटल्या घेऊन, मुलीच्या दप्तरात कोंबल्या. आधी मुलगी तर नंतर तिच्यापाठोपाठ महिला काही वेळाने रवाना झाले. 

'रईस' इन रिअल लाईफ 
काही दिवसांपूर्वी 'रईस' या हिंदी चित्रपटाने बॉक्‍स ऑफीसवर धूम केली होती. चित्रपटातील मुख्य पात्र लहानपणी शाळा सोडून अवैध मार्गावर जोतो. पोलिसांच्या नजरा चुकवून शाळेच्या दप्तरात पुस्तकांसोबत दारूच्या बाटल्या वाहून नेत असल्याचे दृष्य दाखवले. या दृष्याने अनेकांची मनं जिंकून घेतली होती. पण, तेच वास्तवात घडलं तर, प्रत्येकाच्या अंगावर शाहारे येणार हे नक्की. असाच काहीसा प्रकार सध्या शहरात सुरू असून, एक-दोन नाही तर अनेक 'रईस' अकोल्यात रोज घडत आहेत.