'जय जिजाऊ जय शिवराय..." च्या घोषणांनी सेलूनगरी दुमदुमली!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

एकच चर्चा मुंबईत मोर्चा...एक मराठा—लाख मराठा...जय जिजाऊ जय शिवराय अादी गगनभेदी घोषणांनी सेलू नगरी दूमदूमुन गेली. मुंबईत क्रांती दिनानिमित्त बुधवार (ता.९) रोजी होणार्‍या राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर  जनजागृतीसाठी मराठा समाजातील तरूणी व महिलांच्या नेतृत्वात  रविवारी (ता.६)  रोजी सकाळी अकारा वाजता भव्य मराठा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सेलू: एकच चर्चा मुंबईत मोर्चा...एक मराठा—लाख मराठा...जय जिजाऊ जय शिवराय अादी गगनभेदी घोषणांनी सेलू नगरी दूमदूमुन गेली. मुंबईत क्रांती दिनानिमित्त बुधवार (ता.९) रोजी होणार्‍या राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर  जनजागृतीसाठी मराठा समाजातील तरूणी व महिलांच्या नेतृत्वात  रविवारी (ता.६)  रोजी सकाळी अकारा वाजता भव्य मराठा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी दहा वाजल्यापासून सेलू शहरासह ग्रामीण भागातील मराठा समाजाचे तरूण तरूणी अापल्या दुचाकी वाहनांसह एकञ येवू लागले.सकाळी अकराच्या सुमारास महाविद्यालयाच्या मैदानावरून ढोल ताशाच्या गजरात भगवे फेटे परिधान केलेल्या मराठा समाजातील शकडो तरूणी  अापल्या स्कूटीवरून शिस्तीत दोनच्या रांगेत समोर तर त्यांच्या पाठीमागे हजारो मराठा समाजातील तरूण अापल्या मोटार सायकलवरून गगनभेदी घोषणा देत महाविद्यालय रस्त्यावरून मार्गस्थ झाले. पुढे शहरातील  बाबासाहेब मंदिर रोड, गणपती गल्ली, सुभेदार गल्ली, शेरे गल्ली, फुलारी गल्ली, तेली गल्ली, मारवाडी गल्ली, सारंग गल्ली, गोविंदबाबा चौक, जवाहर रोड, क्रांती चौक, नूतन रोड, जिंतूर नाका, बसस्थानक मार्गे अश्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली पोहोचली.या ठिकाणी प्रथम शिस्तीत मराठा समाजातील निवडक पाच मुलिंच्या हस्ते अश्वारूढ छञपती शिवाजी महारांजाच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात अाले.

त्यानंतर शिवाजी महारांजाचा महिलांनी पाळणा गायिला.या ठिकाणी कु.गायकवाड हिने अापले मनोगतात राज्य सरकारला कोपर्डी प्रकरण,मराठा अारक्षण,स्वामीनाथन अायोग,शेतकर्‍यांची कर्जमाफी अादी विषयांवर खडे बोल सुनावले. मराठा समाजातील तरूण,नागरिकांसह महिला क्रांती दिनी मुंबईतील महामोर्चात सहभागी होण्याचे अावाहन केले.या ठिकाणी मुंबईतील महामोर्चात सहभागी होण्याचा एकमुखी निर्धार हजारो तरूणांनी केला.त्यानंतर राष्ट्रगीताने या भव्य रॅलीचा समोराप झाला.