पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले, आता कोण एकटे पडले : शालिनी ठाकरे

पुन्हा एकदा महाभकास आघाडीचे गणित चुकले.
Uddhav Thackeray And Shalini Thackeray
Uddhav Thackeray And Shalini Thackerayesakal

मुंबई : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता.२०) जाहीर झाला. यात भाजपने एक जास्तीची जागा जिंकली आहे. त्यानंतर शिवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही शिवसेना नेते नाॅटरिचेबल आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी ट्विट करुन समाचार घेतला आहे. (Shalini Thackeray Attack On Chief Minister Uddhav Thackeray For Shiv Sena Rebellion MLAs)

Uddhav Thackeray And Shalini Thackeray
अभिनेत्री स्वरा भास्करने केले कन्हैय्या कुमारचे कौतुक, आज तर...

त्या म्हणतात, सबको समजा... आपको समजा क्या? पुन्हा एकदा महाभकास आघाडीचे गणित चुकले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले. आता कोण एकटे पडले हे समजले असेलच. तुमच्यात एकजूट किती आहे, हे सगळ्यांना समजले. पण तुम्हाला कधी समजणार?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केला आहे. एकनाथ महाराज की जय !! मला सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे.

Uddhav Thackeray And Shalini Thackeray
एकनाथ शिंदेंच्या खेळीणे ठाणे पालिकेत आली होती सेनेची सत्ता, भाजपच्या स्वप्नांना सुरुंग

या स्वतःच्या वाक्याचा विसर पडलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज एकनाथ महाराज नक्कीच आठवले असतील. दीपाली ताई आपण आता स्वतःच्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दीपाली सय्यद यांना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com