"राष्ट्रवादी'च्या प्रचाराचा नारळ शरद पवार वाढवणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई कॉंग्रेसमधील वादाचा लाभ उठवण्यासाठी सरसावलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचाराची सुरवात पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते 4 फेब्रुवारीला चेंबूरमध्ये होणार आहे. 

महापालिका निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार आहे. मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी राष्ट्रवादीने 102 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबईतील प्रचारात पवार सहभागी होणार आहेत. त्यांची पहिली जाहीर सभा चेंबूरला 4 फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली. 

मुंबई शहर, ईशान्य मुंबई आणि पश्‍चिम मुंबईत पवारांच्या जाहीर सभा होणार आहेत. महापालिकेत 25 वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता आहे; मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना व भाजपची युती तुटली. कॉंग्रेसमध्ये संजय निरूपम आणि गुरुदास कामत गटातील वाद उफाळून आला. मनसेचा करिष्मा संपल्यात जमा आहे. त्यामुळे महापालिकेसाठी चौरंगी लढती होणार आहेत. मुंबईत मुसंडी मारण्याची संधी राष्ट्रवादीला वाटत असल्याने पक्षाचे नेते सर्वशक्तिनिशी प्रचारात उतरणार आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागील निवडणुकीत 14 जागा जिंकल्या होत्या, तर 24 जागांवर पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आल्यामुळे राष्ट्रवादीने लाभ उठवण्यासाठी कंबर कसली आहे.