शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

शिर्डी - शिर्डी ते मुंबई या एअर इंडियाच्या पहिल्या प्रवासी विमानाला हिरवा झेंडा दाखवून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी काकडी (ता. कोपरगाव) येथील शिर्डी विमानतळाचे उद्‌घाटन केले. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नागरी विमान वाहतूकमंत्री पी. अशोक गजपती राजू यांच्या हस्ते प्रवाशांना बोर्डिंग पास वितरित करण्यात आले.

राष्ट्रपती कोविंद यांचे हवाई दलाच्या खास विमानाने सकाळी दहाच्या सुमारास विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पी. अशोक गजपती राजू, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर लगेचच राष्ट्रपतींनी शिर्डी ते मुंबई या विमानास हिरवा झेंडा दाखविला. नंतर फीत कापून विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे उद्‌घाटन केले. तेथील साईबाबांच्या मूर्तीला हार अर्पण करून त्यांनी विमानतळावरील कोनशिलेचे अनावरण केले. विमानतळाच्या संकल्पचित्राची त्यांनी पाहणी केली. एअर इंडियाने केवळ अठराशे वीस रुपये तिकीट दर आकारून या पहिल्या फेरीसाठी प्रवाशांना विशेष सवलत दिली.