दीडशे शिलेदारांच्या जिवावर शिवसेनेने घेतले शिंगावर 

समीर सुर्वे - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई - मुंबईतील 227 पैकी 150 जागांवरील उमेदवारांच्या जिवावर शिवसेनेने संपूर्ण राज्यातील युती अवलंबून ठेवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेना नेते आणि विभागप्रमुखांच्या बैठकीत मुंबईतील 227 जागांचा आढावा घेतला. त्यातील 100 जागांवर विजयाची खात्री असून 50 जागांवर चुरशीची लढत होईल, अशी खात्री पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. 

शिवसेना-भाजप युती अधांतरी असूनही शिवसेनेने वचननाम्यापाठोपाठ जाहिराती प्रसिद्ध करून एक पाऊल पुढे टाकले आहे. मंगळवारी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठकही "मातोश्री'वर झाली. या बैठकीत 227 जागांवरील उमेदवारांचा अंदाज स्वत: ठाकरे यांनी घेतला. प्रत्येक प्रभागात किमान तीन ते चार इच्छुक उमेदवार असून काही खुल्या प्रभागांत नऊ ते 10 इच्छुक आहेत. आयत्या वेळी उमेदवार शोधावे लागू नयेत, यासाठी ठाकरे यांनी ही खबरदारी घेतली असल्याचे समजते. 

100 जागांवर शिवसेनेला विजयाची खात्री असून 50 जागांवर शिवसेनेचे उमेदवार अटीतटीची लढत देतील, अशी पक्षाला अपेक्षा आहे. या 150 शिलेदारांच्या जिवावर शिवसेनेने राज्यभरातील युतीबाबत अद्याप विचार केलेला नाही. ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेला एकहाती विजयाची खात्री आहे. मुंबईत युतीचा निर्णय झाल्यास संपूर्ण राज्यात युती करण्याच्या हालचालींना वेग येईल. 

शिवसेनेची व्यूहरचना 
मुंबई महापालिकेत बहुमतात येण्यासाठी 114 जागांची आवश्‍यकता आहे. मुंबईतील 50 जागांवर शिवसेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहतील, असा अंदाज आहे. त्यामुळे या प्रभागांत तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात त्याच पक्षातील बंडखोराला उभे करून मतांचे विभाजन करण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. यातील 10 जागा मिळाल्या, तरी शिवसेनेला भाजपची गरज भासणार नाही. 

शिवसेनेने जुळवलेले गणित 
- पक्षाच्या विद्यमान नगरसेवकांसह दुसऱ्या पक्षांतून आलेले 70 ते 75 जण विजयी होतील. 
- मनसेच्या 28 पैकी 12 ते 15 जागा शिवसेनेला मिळतील. 
- मतविभाजन आणि अटीतटीच्या लढाईत 10 ते 15 जागा मिळतील. 

Web Title: Shiv Sena alliance has put on the entire state