"मी कर्जमुक्त होणारच' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

मुंबई - मराठवाड्यातील शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात पक्षाच्या चाळीसपैकी 27 आमदारांनी दांडी मारली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेकडे आमदारांनीच पाठ फिरवल्यानंतरही पक्षप्रमुखांनी आता नव्या अभियानाची घोषणा केली आहे. शिवसंपर्क अभियानाला फारसा प्रतिसाद मिळालेला नसतानाही याच मोहिमेचा दुसरा टप्पा "मी कर्जमुक्त होणारच' अशी एकदिवसीय कार्यशाळा शिवसेना घेणार आहे. 

नाशिकमध्ये 19 मे रोजी होणाऱ्या या कार्यशाळेत कृषितज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवसंपर्क अभियानाला गैरहजर राहणाऱ्या आमदारांची कानउघडणी केल्यानंतर गैरहजेरीची कारणे पक्षप्रमुखांना पाठवली जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; पण आमदारांची सारवासारव उद्धव यांच्या पचनी पडलेली नाही. पक्षाचे 27 आमदार अभियानात गैरहजर होते. मोजकेच आजी-माजी नगरसेवकही या अभियानात सहभागी झाले होते. संपर्क अभियानाला गैरहजर राहणाऱ्यांची उद्धव यांनी कानउघडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शिवसंपर्क अभियानात कोणाचाच कोणाला संपर्क नसल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे आता कर्जमुक्त कार्यशाळेत आमदार नगरसेवकांची हजेरी महत्त्वाची आहे, असे फर्मान पक्षातर्फे काढण्यात आले आहे.

महाराष्ट्र

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या...

06.27 AM

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM