यूपीत 2 उपमुख्यमंत्री, येथे एकही का नाही?- शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

हिंदुत्ववादाला बळ, पण..
आदित्यनाथ यांच्या नेमणुकीने राम मंदिराच्या निर्मितीस चालना मिळेल व हिंदुत्ववाद्यांना बळ मिळेल. पण शेवटी पोटाची आग महत्त्वाची. 

मुंबई : भाजपने उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक केली आहे. महाराष्ट्राचा प्रश्न आला तेव्हा कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रिपद निर्माण होणार नसल्याचा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगण्यात आले, असा मुद्दा शिवसेनेने उपस्थित केला आहे. 

'जम्मू–कश्मीरमध्ये भाजपने उपमुख्यमंत्रिपद स्वीकारून थेट मेहबुबा मुफ्ती यांच्याशीच "मांडवली" केली. उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्र्यांना नेमून आदित्यनाथ महाराजांना धर्मकारणासाठी मोकळे ठेवले,' असा टोला लगावतानाच 'अर्थात हे कधीतरी व्हायलाच हवे होते' अशीही भूमिका शिवसेनेने 'सामना'मध्ये मांडली आहे.

हिंदुत्ववादाला बळ, पण..
आदित्यनाथ यांच्या नेमणुकीने राम मंदिराच्या निर्मितीस चालना मिळेल व हिंदुत्ववाद्यांना बळ मिळेल. पण शेवटी पोटाची आग महत्त्वाची. 

साधूचे भाग्य फळफळले
उत्तर प्रदेशमधील साधूचे राजकीय भाग्य फळफळले आहे. मात्र यावर भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनी ऊरबडवेगिरी करण्याची गरज नाही. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी गोरखपूर मठाचे महंत योगी आदित्यनाथ यांची निवड संपूर्ण लोकशाही मार्गाने झाली आहे, असे सामनात म्हटले आहे. 

कर्जमाफीचे काय?
कायद्याचे राज्य कोलमडले होते ते नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना पुन्हा उभे करावे लागेल. मुख्य म्हणजे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलेल्या
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय करणार, हा खरा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशात गरिबी आहेच आणि  रोजगारही नाही. त्या राज्यातील भूमिपुत्रांना रोजगारात ९० टक्के प्राधान्य देण्याची घोषणा नव्या मुख्यमंत्र्यांनी केली हा शिवसेनेच्याच विचारांचा विजय आहे. 
 

Web Title: shiv sena questions appointment of two deputy cm in uttar pradesh