शिवसेना पाठविणार विस्ताराचा प्रस्ताव 

शिवसेना पाठविणार विस्ताराचा प्रस्ताव 

मुंबई - भाजपबरोबरचे संबंध निवळल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा प्रस्ताव शिवसेनेकडून पाठवला जाण्याची शक्‍यता आहे. मात्र, भाजपशी असलेले संबंध ताणण्याचा पवित्रा शिवसेनेतील काही नेत्यांनी घेतला असल्यामुळे अद्याप त्याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे शिवसेनेतील नाराजीची योग्य दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहा एप्रिल रोजी मंत्री-आमदारांची एकत्रित बैठक बोलावली आहे. दुसरीकडे शिवसेनेतील विधानसभा सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होताच भाजपमध्येही कोण मंत्री होणार याची चर्चा सुरू झाली आहे. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वीचा हा शेवटचा विस्तार असेल असे बोलले जात असल्याने सर्व इच्छुकांनी संभाव्य विस्ताराकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. 

शिवसेनेतील नाराजीची योग्य दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहा एप्रिल रोजी मंत्री-आमदारांची एकत्रित बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदारांची तसेच जनतेची कामे करत नाहीत अशी तक्रार सातत्याने सुरू आहे. पक्षातील हा असंतोष दूर करण्यासाठी ठाकरे यांनी स्वत: मंत्री आणि आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली होती. आता सहा एप्रिलला दोघांचीही एकत्रित बैठक घेतली जाणार आहे. 

जनतेशी संपर्क असणाऱ्या गुलाबराव पाटील, संजय राठोड यांना पदोन्नती देण्याची चर्चा आहे. मुंबईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सुनील प्रभू, वसमतचे आमदार आणि माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, कोल्हापुरातून राजेश क्षीरसागर यांचा शपथविधी निश्‍चित असल्याचे मानले जाते. कर्जमुक्‍तीची मागणी हाच शिवसेनेने मागणीचा विषय ठेवावा अन्य कोणतेही विषय सरकारसमोर मांडू नयेत, अशी शिवसेनेतील काहींची भूमिका असल्याने या विस्ताराबाबत आताच काही सांगणे शक्‍य नसल्याचेही मत व्यक्‍त केले जाते आहे. मात्र, विधान परिषदेत निवडून आलेल्या नेत्यांना संधी दिल्याने पक्षाला कोणताही लाभ होत नसल्याची तक्रार आमदारांनी केली असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेचे मंत्री असे काही घडले नसल्याचे स्पष्ट करत असतात. मात्र, "मातोश्री'वर आम्ही आमच्या भावनांना वाट करून दिल्याचे आमदार सांगतात. सरकारमध्ये आपली भूमिका आक्रमक असावी, असेही या बैठकीत सांगण्यात येणार असल्याचे समजते. शिवसेनेला सत्तेत राहतानाच शेतकऱ्यांचे प्रश्‍न व्यापक पद्धतीने मांडण्याची गरज वाटत असल्याचे सांगण्यात येते आहे. संपर्कनेते तसेच मुंबईहून येणाऱ्या नेत्यांबद्दल शिवसेनेत कमालीची नाराजी असल्याचे बोलले जाते. 

भाजपमध्येही चर्चा 
शिवसेनेतील विधानसभा सदस्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सुरू होताच भाजपमध्येही कोण मंत्री होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेत भाजपला शिवसेनेच्या बरोबरीत आणणाऱ्या आशिष शेलार यांना विस्तारात संधी मिळणार असे जवळपास निश्‍चित मानले जात असतानाच देवयानी फरांदे, प्रशांत बंब अशा तरुण नावांची चर्चाही सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वीचा हा शेवटचा विस्तार असेल असे बोलले जात असल्याने सर्व इच्छुकांनी संभाव्य विस्ताराकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com