पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेनेचा भापजवर हल्ला 

shivsena-bjp
shivsena-bjp

मुंबई - भाजप सरकारची राज्यातली स्थापना अपारदर्शकतेपासून झाली असून, पारदर्शकतेविषयी बोलण्याचा भाजपला कोणताही नैतिक अधिकार नसल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. कोणाच्या मदतीने भाजपने सभागृहात बहुमत सिद्ध केले, हे जाहीर करावे, अशी मागणी करत शिवसेनेने भाजपच्या राज्यातील सत्तेलाच आव्हान दिले आहे. नागपूर महापालिकेवर भाजपने दरोडा टाकला असल्याचा आरोप करीत शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे. 

पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेनेची कोंडी करणाऱ्या भाजपलाही पारदर्शकतेचेच धडे शिकवण्याचा विडा शिवसेनेने उचलला आहे. शिवसेनेचे आमदार आणि नागपूरचे संपर्क प्रमुख अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत भाजपच्या सत्तेचे बहुमतच मुळात अपारदर्शक असल्याचा दावा या वेळी केला. शिवसेनेने सरकारला पाठिंबा देण्यापूर्वी भाजपचे सरकार अस्थिर होते, त्या वेळीस त्यांनी बहुमत सिद्ध कसे केले, असे कोणते "डील' केले हे जनतेला कळले पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली. अल्पमतात असलेले भाजपचे सरकार बहुमतात कसे आले, हे भाजपने जाहीर करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे 

पारदर्शकतेच्या मुद्द्यावर युती तुटली हे सांगणाऱ्या भाजपला पारदर्शकतेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सांगत शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 

शिवसेनेचे नागपूरचे संपर्क प्रमुख असणाऱ्या अनिल परब यांनी भाजपच्या ताब्यात असलेल्या नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही या वेळी केला. नागपूरमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी "ओसीडब्ल्यू' कंपनीसोबत करार करण्यात आला होता. ही कंपनी कोणाची आहे? नागपूरमध्ये पाण्याचे दर 4 रुपयांवरून 22 रुपये करण्यात आले; पण नागपूरकरांना 24 तास पाणी मिळालेले नाही. हा नागपूरकरांच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा आहे, मग भाजपला दरोडेखोर म्हणायचे का, असा प्रश्‍न परब यांनी उपस्थित केला. 

मुंबईतील खड्ड्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपच्या ताब्यात असलेल्या नागपूर महापालिकेच्या सिमेंट कॉंक्रीट रस्त्याच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचे परब म्हणाले. नागपूरच्या महापालिका आयुक्तांना यासंदर्भात अनिल परब यांनी एक पत्र दिले होते. मात्र त्यावर आयुक्‍तांनी उत्तर न दिल्याने या अधिवेशनात त्यांच्यावर हक्‍कभंग आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com