शिवाजी पार्कवरही ध्वनिवर्धकास मनाई?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई - शिवाजी पार्कसह अन्य शांतता क्षेत्रांत ध्वनिवर्धक लावण्यास मनाई करण्याचा आदेश राज्य सरकारने आता परिपत्रकाद्वारे जारी केला आहे. 

मुंबई - शिवाजी पार्कसह अन्य शांतता क्षेत्रांत ध्वनिवर्धक लावण्यास मनाई करण्याचा आदेश राज्य सरकारने आता परिपत्रकाद्वारे जारी केला आहे. 

शिवाजी पार्क परिसराचा समावेश शांतता क्षेत्रात असूनही राज्य सरकारने ध्वनिवर्धक लावण्यास परवानगी दिली होती, अशी तक्रार मूळ याचिकादार वेकॉम ट्रस्टने न्यायालयात केली आहे. नुकत्याच झालेल्या रथयात्रा आणि बालदिन सोहळ्यात न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे राज्य सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. मंगळवारी राज्याचे महाधिवक्ता रोहित देव यांनी न्यायालयात राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाबद्दल माहिती दिली. या परिपत्रकानुसार शांतता क्षेत्रांत ध्वनिवर्धक लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, असेही स्पष्ट केलेले आहे. या याचिकेवर बुधवारी (ता. 25) खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी होणार असून, याचिकादारांनी बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.