तुकाराम मुंढे, जरा जपून!- शिवसेना

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

मुंबई - आयुक्त हा सरकारचा प्रतिनिधी असतो व त्याने घटना व कायद्याच्या चौकटीत राहून काम करायचे असते. लोकप्रतिनिधींच्या कुंडल्या काढून त्यांना अडचणीत आणायचे व स्वत:चा धडाकेबाजपणा सिद्ध करायचा हे योग्य नाही. स्वत: मुख्यमंत्री विरोधकांशी विनम्रतेने वागतात व तेवढा संयम हा ठेवायलाच हवा. राज्य संयमाने व एकीने चालवायचे असते. तुकाराम मुंढे यांच्यासमोर मोठी कारकीर्द आहे. त्यांना मोठे काम करायचे आहे, पण संयमाचा बांध तोडून डोक्यात राग घालून काम केले तर त्यांचे कठीण आहे, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याविरोधात मतदान केल आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. याच विषयावरून शिवसेनेने सामना या मुखपत्रातील अग्रलेखातून मुख्यमंत्री व भाजपला लक्ष्य करण्यात आला आहे.

शिवसेनेने म्हटले आहे, की लोकशाहीत बहुमताला किंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी उगाच ईरेला पेटू नये. निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी एकमुखाने मुंढे यांच्या विरोधात उभे ठाकले असतील तर सरकारला बहुमताचा आदर करावाच लागेल. भारतीय जनता पक्षाच्या फक्त सहा नगरसेवकांना मतदानाचे स्वातंत्र्य दिले असते तर त्यांनीही मुंढेविरोधाचा षटकार ठोकलाच असता. राज्य ग्रामपंचायतीचे असो नाही तर विधानसभा आणि लोकसभेचे, ते बहुमतावरच चालते. तुकाराम मुंढे हे धडाडीचे किंवा प्रामाणिक, सचोटीचे असतीलही, पण राज्यात आणि देशात तेच एकमेव सचोटीचे आहेत असे सांगणे हा इतर प्रामाणिक अधिकार्‍यांचा अपमान आहे. शिवसेनेने आतापर्यंत सर्वच प्रामाणिक आणि धडाडीच्या अधिकार्‍यांना पाठबळ दिल्याची नोंद इतिहासात आहे.