शिवसेनेचे सगळे मंत्री काढून टाका

तुषार खरात - सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मार्च 2017

सेना आमदार घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई: शिवसेनेचे मंत्री काहीच काम करीत नाहीत, शेतकरी कर्जमाफीच्या विषयांवर गंभीर नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे वगळता सगळ्या शिवसेना मंत्र्यांना काढून टाका, अशी संतप्त भूमिका सेना आमदारांनी घेतली आहे. एवढेच नव्हे तर, सगळे आमदार लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सेनेचे मंत्री बदलण्याची मागणी करणार आहेत.

सेना आमदार घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई: शिवसेनेचे मंत्री काहीच काम करीत नाहीत, शेतकरी कर्जमाफीच्या विषयांवर गंभीर नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे वगळता सगळ्या शिवसेना मंत्र्यांना काढून टाका, अशी संतप्त भूमिका सेना आमदारांनी घेतली आहे. एवढेच नव्हे तर, सगळे आमदार लवकरच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सेनेचे मंत्री बदलण्याची मागणी करणार आहेत.

विशेष म्हणजे, शेतकरयांची कर्जमाफी करा, अशी भूमिका घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज (बुधवार) विधानसभेत घोषणाबाजी केली. आम्हालाही घोषणाबाजी करू द्या, अशी विनंती सेना आमदारांनी त्यांच्या मंत्र्यांकडे केली. पण सेनेच्या मंत्र्यांनी सरकार विरोधात भूमिका घ्यायला विरोध केला. त्यामुळे सेना आमदार खवळले.

विशेषत: ग्रामीण भागातील आमदार प्रचंड चिडले
अशातच काँग्रेस व राष्ट्रवादीची घोषणाबाजी सर्व वृत्तवाहिन्यांवर दिसू लागली. त्यातच भर म्हणजे अजित पवार यांचे शेतकरयांबद्दलच्या भाषणामुळे सेना आमदारांची अस्वस्थता वाढली. शेतकरयांच्या कर्जमाफीला शिवसेनेचा पाठींबा नाही की काय, असा संदेश जाऊ लागला. त्यामुळे सेना आमदार भडकले आणि त्यांनी विधानसभाध्यक्षांना निरोप पाठवला, सभागृहाचे कामकाज तात्काळ तहकूब करा, अन्यथा आम्ही वेलमध्ये येऊन गोंधळ घालू. त्यानंतर थोड्याच वेळात सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सेनेचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष
शिवसेनेला फक्त मुंबई आणि ठाणे हवे आहे. राज्यात शिवसेनेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून निवडून आलेल्या आम्हा आमदारांची पंचाईत होत आहे. अशातच एकनाथ शिंदे वगळता सेनेचे मंत्री आम्ही घेऊन गेलेलो जनहिताची कामे करीत नाहीत. त्यामुळे आम्ही सगळ्या आमदारांनी नुकतीच एक बैठक घेतली. शिंदे वगळता सर्व मंत्र्यांना काढून टाका, अशी मागणी घेऊन आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत, असे एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Web Title: shivsena MLA will visit uddhav thackeray