शिराळ्यात आदेशाचे पालन करत नागपंचमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

शिराळा - जिवंत नाग पूजेची परंपरा अनेक वर्षे जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग तिसऱ्या वर्षी उत्साहाला मुरड घालत नागप्रतिमांची पूजा केली. 

शिराळा - जिवंत नाग पूजेची परंपरा अनेक वर्षे जोपासणाऱ्या शिराळकरांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत सलग तिसऱ्या वर्षी उत्साहाला मुरड घालत नागप्रतिमांची पूजा केली. 

जिवंत नागांची पूजा करणारे शिराळकर यंदा कशी पूजा करणार, याबद्दल पर्यटक व प्रशासकीय यंत्रणेला उत्सुकता होती. परंतु अंगावर पावसाच्या सरी झेलत हजारो भाविकांच्या उपस्थितीत संयमाने नागपंचमी साजरी झाली. मिरवणूक मार्गावर स्वागत फलकांऐवजी काळे झेंडे लावले होते. सकाळी सहापासून नागमंडळे अंबामाता मंदिरात पूजेसाठी येत होती. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात झाली. महिलांनी अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली. 10 कॅमेऱ्यांद्वारे यंत्रणेने मिरवणुकीवर लक्ष ठेवले. मंडळांनी पारंपरिक वाद्यांवर भर दिला होता. दुपारी अडीच वाजता महाजन यांच्या घरी नागप्रतिमेची पूजा करून मानाची पालखी अंबामाता मंदिराकडे रवाना झाली. पालखीचा मान भोई समाजाकडे आहे. 63 नाग मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी 90 कर्मचाऱ्यांची पाच पथके नियुक्त केली होती. आरोग्य विभागाने सात ठिकाणी पथके नेमून सर्पदंशाच्या लसींचा पुरेसा साठा ठेवला.