...तर राज्यसभेसाठी एमआयएम तटस्थ राहणार

महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा
Asaduddin-Owaisi-AIMIM
Asaduddin-Owaisi-AIMIMesakal

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं उघड मदत मागितली नाहीतर एमआयएम तटस्थ राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहेत. अशा प्रकारे एमआयएमनं थेटपणे प्रतिसादच दिल्यानं या दोन मतांसाठी मविआ एमआयएमच्या नेत्यांशी संपर्क करणार का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. (so MIM will remain neutral for Rajya Sabha)

Asaduddin-Owaisi-AIMIM
शिवसेनेनं का दिली उमेदवारी? अहिर, पाडवींनी सांगितलं कारण

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी स्पष्ट केलं होतं की, महाविकास आघाडीनं उघडपणे मदत मागावी, त्यांनी जर मदत मागितली तर आम्ही त्यांना मतदान करु. पण जर मविआनं असं केलं नाही तर आम्ही भाजपलाही मतदान करणार नाही, तटस्थ राहू.

Asaduddin-Owaisi-AIMIM
जामखेडमध्ये भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम', रोहित पवार निशाण्यावर!

याप्रकरणी शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार म्हणाले, "मुख्यमंत्र्यांनी जर मला आदेश दिला तर मी एमआयएमशी जरुर चर्चा करेन. पण पक्षप्रमुखांच्या आदेशाशिवाय मी त्यांच्याशी चर्चा करु शकत नाही. ते मतं देण्यासाठी इच्छुक असल्याची मला जाणीव आहे. ज्यावेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एमआयएमच्या नेत्यांशी आमच्या भेटी झाल्या त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की, मविआनं जर मत मागितली तर आम्ही निश्चितपणे मदत करु"

Asaduddin-Owaisi-AIMIM
HSC Result 2022: बारावीत यंदाही कोकण विभागाची बाजी; निकाल जाहीर

उद्धव ठाकरेंनी मदत मागावी न मागावी त्याऐवजी मविआतील दोन पक्षांनी मत मागितले तर एमआयएमची दोन मते त्यांना मिळतील. यानंतर कदाचित शिवसेनेना राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा कोटा देतील. जर ही दोन मतं कमी पडली तर आम्ही भोकरदनमधील रावसाहेब दानवेंचे चिरंजीव यांची मदत घेऊ. आम्ही त्यांना विनंती केली आहे, ते आम्हाला मतदान करतील की नाही ते १० तारखेला कळेल. माझ्या उपकाराची परतफेड करायची असेल तर त्यांना आम्हाला मतदान करावं लागेल, असं दावाही यावेळी अब्दुल सत्तार यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com