कुलभूषण यांच्या सुटकेसाठी आईवडील देवाच्या दारी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सोलापूर - हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुखरूप सुटकेसाठी त्यांच्या आई वडिलांनी सोलापूर, पंढरपूर व तुळजापूर येथील देव-देवतांना साकडे घातले. सोलापुरातील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारकासही त्यांनी भेट दिली. 

कुलभूषण जाधव यांची आई अवंती जाधव आणि वडील सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुधीर जाधव यांनी सोमवारी (ता.17) सकाळी श्री तुळजाभवानीच्या दर्शनानंतर पंढपूरला जाऊन "आपला मुलगा सुखरूप मायदेशी यावा,' असे साकडे विठ्ठलाला घातले. मंगळवारी सकाळी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेऊन सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. 

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती मिळवली आहे. हाच निर्णय कायम राहावा आणि आपला मुलगा परत यावा हीच आस घेऊन हे माता- पिता देवाच्या दारी जात आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनी जाधव दांपत्यांची भेट घेतली,  ""प्रसारमाध्यमांशी आम्ही बोललो तर त्याचे अनेक अर्थ काढले जातील व कुलभूषण अडचणीत येईल,'' असे अवंती जाधव यांनी सांगितले, तर कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश जाधव कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याचे आमदार शिंदे यांनी या वेळी सांगितले. 

महाराष्ट्र

कुडाळ : तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाचा आणि...

04.27 PM

मुंबई : 'हगलेलं तरंगत' ही आपल्याकडे गावरान म्हण आहे. कितीही खोटं बोलला तरी ते पुढे येणार आहे. सोशल मिडीयात काही लपून राहत नाही....

01.18 PM

मुंबई  - ज्या सोशल मीडियाच्या शिडीवरून भाजपने केंद्र आणि राज्यात सत्ता काबीज केली, तोच सोशल मीडिया भाजपसाठी कर्दनकाळ...

07.52 AM