शिक्षकांच्या पगारासाठी आमदारांची पदयात्रा सुरू; शिक्षणमंत्र्यांच्या घरी पोचणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

आमदार सावंत, देशपांडे यांचा सहभाग; रविवारी पोचणार शिक्षणमंत्र्यांच्या मुंबईतील घरी

सोलापूरः राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी एक व दोन जुलैला अनुदानास पात्र झालेल्या शाळांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्यापही त्या शाळांना अनुदान दिलेले नाही. त्या शाळांना अनुदान देऊन शिक्षकांचा पगार सुरू करावा, यासह इतर मागण्यांसाठी आमदार दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे यांनी पुणे येथील भिडे वाड्यातून "शिक्षण बचाव' पदयात्रा सुरू केली आहे. ती येत्या रविवारी (ता. 23) शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोचणार आहे.

अनुदानास पात्र झालेल्या शाळांना मिळत नसलेले अनुदान, शिक्षकांची थांबलेली पदभरती, शिक्षणाचा ढासळलेला दर्जा अशा शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्‍नांसाठी शिक्षक आमदार, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि शिक्षक सेनेच्यावतीने ही पदयात्रा काढली जात आहे. राज्यभरातील शिक्षकांचे प्रश्‍न या पदयात्रेतून सरकारपुढे मांडले जाणार आहेत. पुणे येथून 17 जुलैपासून ही पदयात्रा सुरू झाली आहे. पुणे-मुंबई या जुन्या महामार्गावरून ही पदयात्रा सुरू आहे. आज ती कामशेत येथे होती. पुणे-मुंबई रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्या पडत्या पावसातही या आमदार द्वयींची ही पदयात्रा सुरूच आहे. आमदार सावंत, देशपांडे यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राजाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हेही या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर राज्यातील जनता, शिक्षक व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन केले आहे.

सरकारने लक्ष देण्याची गरज
शिक्षकांच्या प्रश्‍नासाठी आमदारांनी पदयात्रा सुरू केली आहे. पावसामध्ये भिजत ते पुणे-मुंबई या रस्त्यावरून चालत आहेत. त्यामुळे बिनपगारी काम करणाऱ्या शिक्षकांना पगार देऊन या पदयात्रेचे सार्थक करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे. सरकारने या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :