सरकारमध्ये राहण्याबाबत 26 नंतर निर्णय - राजू शेट्टी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

माढा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना 26 जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर सरकारमध्ये राहायचे किंवा नाही याबाबत निर्णय संघटना घेईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. 

माढा येथील ऊस परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, की गेल्या वर्षी डाळी, खाद्यतेलाचे उत्पादन चांगले झाले असतानही कृषिमंत्र्यांच्या मोठ्या प्रमाणावर कृषिमाल आयात करण्याच्या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांचा सत्यानाश झाला आहे. भरपूर उत्पादन होऊनही मागील एक-दोन वर्षांत कृषिमालाची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एकीकडे पंतप्रधान तेलबियाचे उत्पादन वाढवायला सांगतात व दुसरीकडे खाद्यतेलाची आयात केली जाते हा विरोधाभास आहे. केंद्राच्या शेतीमाल आयात-निर्यात धोरणात ताळमेळ नाही. बॅंकांनी कृषीकर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी मुंबईतही शेतकरी असल्याचे दाखवून कर्जवाटप केले आहे. ठिबक सिंचनासाठी अनुदान द्यावे. दुधाचे भाव वाढविण्याचे आदेश दिले; मात्र दुधाची पावडर करण्याबाबत पुरेशी व्यवस्था केली नसल्याने दुधाचे दर पडले.'' 

""कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबाबत समितीच निर्णय घेईल,'' असे म्हणत या प्रकरणावर बोलण्याचे त्यांनी टाळले.