एसटी वेतनवाढीचा तिढा कायम

ST
ST

मुंबई - वेतनवाढीसाठी अघोषित संप करून एसटी प्रशासनाला खिंडीत गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाढीव वेतनाचे पैसे स्वीकारले आहेत; मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरूच ठेवल्याने तिढा कायम आहे. या वादावर अंतिम निर्णय आता औद्योगिक न्यायालयातच होण्याची चिन्हे आहेत.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी वर्धापनदिनाचा मुहूर्त साधत कर्मचाऱ्यांना वेतनवाढ घोषित केली. ती अपुरी असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांच्या वतीने सोशल मीडियाद्वारे संपाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार 8 व 9 जून रोजी कडकडीत संप करण्यात आला. त्यानंतर कामगार संघटना व महामंडळ यांच्यात तडजोड होऊन संप मागे घेण्यात आला.

कर्मचाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे चार हजार 849 कोटींची वाढीव पगारवाढ महामंडळाकडून टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे. जुलै व ऑगस्टमध्ये झालेला पगार हा वेतनवाढीप्रमाणे जमा करण्यात आला आहे. मात्र, अजूनही वेतनवाढीच्या सूत्राला मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनांचा विरोध कायम आहे. खात्यात पैसे जमा झाल्याने कर्मचाऱ्यांनी ते स्वीकारले आहेत. मात्र 31 मार्च 2016 च्या मूळ वेतनात अधिकची रक्कम मिळवून दिल्याशिवाय कृती समिती स्वस्थ बसणार नाही, असे कामगार संघटनांनी स्पष्ट केले आहे.

आकडे बोलतात
एकूण वेतनवाढ : 4,849 कोटी
कर्मचाऱ्यांची संख्या : 1 लाख 5 हजार 679
31 मार्च 2016 चे एकूण मासिक मूळ वेतन : 87 कोटी

महामंडळाची वेतनवाढ फसवी आहे. ती जाहीर केल्याप्रमाणे नसून मान्यताप्राप्त संघटनेला व आयोग कृती समितीला अमान्यच आहे. पगार बॅंकेच्या खात्यावर जमा केल्याने नाइलाजास्तव स्वीकारणे भाग पडत आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com