राज्य सरकारतर्फे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई - राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
राज्यातील / जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी युवा पुरस्कार देण्यात येतात.

मुंबई - राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
राज्यातील / जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, युवा विकासाचे कार्य करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी युवा पुरस्कार देण्यात येतात.

जिल्हा युवा पुरस्कार जिल्हा स्तरावर एक युवक, एक युवती, तसेच नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. तर राज्यस्तर युवा पुरस्कार क्रीडा विभागाच्या क्षेत्रीय विभागानुसार प्रत्येक विभागातील एक युवक, एक युवती, तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहे. राज्य पुरस्काराचे स्वरूप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार व्यक्तीस 50 हजार रुपये असे आहे. तर संस्थेसाठी गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पुरस्कार 1 लाख रुपये असा आहे. राज्य युवा पुरस्कार सन 2014-15 आणि 2015-16 करिता क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या समितीने क्रीडा विभागाच्या आठ विभागांतून (मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर आणि अमरावती) प्रत्येकी आठ युवक, आठ युवती आणि आठ संस्थांची निवड केली आहे.

राज्य युवा पुरस्कारार्थी (2014-15) -
मुंबई विभाग : प्रतिम सुतार- रायगड, स्नेहल शिंदे- मुंबई शहर, प्रिझम सामाजिक विकास संस्था- मुंबई उपनगर.
नाशिक विभाग : विनीत मालपुरे- कळवण, पूनम घुगे- नाशिक, वनवासी उत्कर्ष समिती- नंदुरबार.
पुणे विभाग : प्रवीण निकम- पुणे, नेहा भाटे- पुणे, स्नेहालय संस्था- नगर.
कोल्हापूर विभाग : लखन जाधव- कोल्हापूर, श्वेता परुळेकर- कोल्हापूर, नेहरू युवा मंडळ- पांगरी, सातारा.
औरंगाबाद विभाग : पठाण अझहर खान- औरंगाबाद, काजल भुसारे- औरंगाबाद, शाहू महाराज प्रतिष्ठान- बीड.
लातूर विभाग : उमाकांत मिटकर- उस्मानाबाद, सुरेखा गिरी- लातूर, सोपानराव तादालपुरकर क्रीडा मंडळ- नांदेड.
नागपूर विभाग : सारंग राघाटटे- वर्धा, पल्लवी आमटे- चंद्रपूर, इको. प्रो. बहु. संस्था- चंद्रपूर.
अमरावती विभाग : विशाल राखोडे- अमरावती, खुशबू चोपडे- अकोला, दीपस्तंभ संस्था- अमरावती.

राज्य युवा पुरस्कारार्थी (2015 -16)
मुंबई विभाग : विनायक कोळी- ठाणे, प्रणिता गोंधळी- रायगड, पंचशील सेवा संघ- मुंबई उपनगर.
नाशिक विभाग : मनोहर जगताप- नाशिक, रूपाली माळी- धुळे, भरारी बहुउद्देशीय संस्था- जळगाव.
पुणे विभाग : चिंतामणी पवार- सोलापूर, दीक्षा दिंडे- पुणे, अनाथ प्रेम संस्था- नगर.
कोल्हापूर विभाग : अजित पोवार- कोल्हापूर, प्रियंका पाटील- कोल्हापूर, जनकल्याण संस्था- कोल्हापूर.
औरंगाबाद विभाग : स्वप्नील चंदणे- औरंगाबाद, अश्विनी महिरे- औरंगाबाद, युवा प्रतिष्ठान- हिंगोली.
लातूर विभाग : प्रवीण पाटील- लातूर, कृष्णाई उळेकर- उस्मानाबाद, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण सेवाभावी संस्था- नांदेड.
नागपूर विभाग : राजेश तलमले- भंडारा, अर्चना चुधरी- गडचिरोली, आरोग्य प्रबोधिनी- गडचिरोली.
अमरावती विभाग : ऋषिकेश खिलारे- अमरावती, शारदा सोनकर- अकोला, स्वामी विवेकानंद बहुशैक्षणिक संस्था- शिरपूर, मालेगाव, वाशीम.

Web Title: The state government announced the state youth award