मुनगंटीवारांच्या कार्यालयास आयएसओ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

मुंबई - राज्याचे अर्थ, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रालयीन कार्यालयाला आयएसओ मानांकन प्रदान करण्यात आले असून, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. आयएसओ मानांकन प्राप्त करणारे हे देशातील पहिले मंत्री कार्यालय ठरले आहे.

फडणवीस यांनी मुनगंटीवार यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. शासनाच्या सर्व विभागांचे आयएसओ मानांकन करून विभागाशी संबंधित सर्व कामकाजाची एक प्रमाणित कार्यपद्धती विकसित केली जाईल. त्यास मुनगंटीवार आणि त्यांचे कार्यालय मार्गदर्शन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केले.