उद्धव यांच्या भेटीसाठी मुनगंटीवार 'मातोश्री'वर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची "मातोश्री'वर भेट घेतली. या भेटीत मुनगंटीवार यांनी येऊ घातलेल्या वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्याच्या मसुद्याचे सादरीकरण ठाकरे यांच्यासमोर केले. "जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांना मिळणाऱ्या महसुलात घट होणार आहे. ही घट सध्या मिळणाऱ्या कराच्या तुलनेत कशी भरून काढता येईल, याबाबत या वेळी प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.

या वेळी शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक उपक्रम (मोठे प्रकल्प) एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार सुनील प्रभू उपस्थित होते. मुनगंटीवार यांनी ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण केले असले तरीही ठाकरे यांनी अंतिम होकार कळवला नाही. त्यामुळे ठाकरे या मसुद्याचा सविस्तर खोलात जाऊन अभ्यास करतील. तसेच या विषयातील जाणकारांचे मार्गदर्शन घेतील. त्यानंतरच आपली मते स्पष्ट करतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे मुनगंटीवार "जीएसटी'बाबत उद्धव यांची आणखी भेट घेण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

"जीएसटी' लागू झाल्यानंतर महानगरपालिकांचा कमी होणाऱ्या महसुलाची राज्य सरकार हमी घेणार आहे. यामुळे मुंबई महापालिकेची आर्थिक स्वायत्ता कायद्यानेच अबाधित राखली जाणार असल्याचे मुनगंटीवार यांचे म्हणणे आहे, असे सांगितले जाते. जकातीच्या उत्पन्नाएवढी भरपाई एक महिना अगोदर केंद्राच्या मदतीची वाट न पाहता देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी "एलबीटी' रद्द झाला आहे, त्या ठिकाणच्या महापालिकांना हाच नियम लागू राहणार आहे. भरपाईसाठी मुंबई महापालिकेचे 2016-17 चे उत्पन्न गृहीत धरले जाणार आहे. राज्य सरकार दरवर्षी आठ टक्‍के वाढीने भरपाईची रक्‍कम देणार आहे.

महाराष्ट्र

मुंबई - राज्यातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पर्यटन धोरणानुसार संबंधित संस्थांच्या...

02.57 AM

मुंबई  - जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यासाठी आता किमान दोन पंचमांश सदस्यांनी लेखी विनंती करणे आवश्‍यक आहे....

02.33 AM

मुंबई - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कॉंग्रेस सोडण्याच्या निर्णयाचे काऊंटडाऊन सुरू...

02.03 AM