मुंबईजवळ आढळल्या संशयित शस्त्रसज्ज व्यक्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

मुंबई- उरणजवळ चार ते पाच शस्त्रसज्ज संशयित आढळले असून, नौदलाने त्यांच्याविरोधात शोधमोहीम सुरू केली आहे. दरम्यान, मुंबईत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उरणजवळ असलेल्या नौदलाच्या शस्त्रसाठा भांडार आयएनएस अभिमन्यूजवळ संशयित व्यक्ती दिसल्याचा दावा दोन विद्यार्थ्यांनी आज (गुरुवार) केला आहे. यानंतर नौदलाने परिसरामध्ये शोधमोहिम सुरू केली आहे. नौदलासह लष्कर व मुंबई दहशतवाद विरोधी पथकासह सर्व सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनीही ठिकठिकाणी नाकेबंदी केली असून, वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईत पोलिसांनी अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. कुलाबा पोलिसांनीदेखील अधिकाऱयांना अतिदक्षतेचा इशारा दिला असून, सुरक्षेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चार ते पाच संशियत पहाटे 6 वाजता शस्त्रांसह संशयित हालचाली करताना दिसले आहेत. मात्र, गुप्तचर विभागाने सध्यातरी अशी कोणतीही संशयित गोष्ट आढळली नसल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्र

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कर्जमुक्तीवरून राज्य सरकारवर पुन्हा शरसंधान केले आहे. राज्यात कर्जमुक्तीची...

05.33 AM

मुंबई - कोकण परिसरात भाजपला अपेक्षित यश मिळत नसल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पक्षात घेतले जाणार हे निश्‍चित आहे...

04.45 AM

मुंबई - स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत राज्यभरात 418 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सरकार हादरले आहे. मात्र त्यातील जवळपास 60 टक्के...

03.45 AM