शिक्षक, शिक्षकेतरांसाठी निधीच्या तरतुदीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

मुंबई - अनुदानास पात्र शिक्षकांची आकडेवारी जाहीर होऊनही अद्याप वेतन मंजूर न झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात निधीची तरतूद करावी, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ही माहिती दिली. 

मुंबई - अनुदानास पात्र शिक्षकांची आकडेवारी जाहीर होऊनही अद्याप वेतन मंजूर न झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात निधीची तरतूद करावी, अशी मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. शिक्षक परिषदेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी ही माहिती दिली. 

शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुख्य सचिवांकडे ही मागणी करण्यात आल्याचे बोरनारे यांनी सांगितले. जुलैमध्ये खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि तुकड्यांवरील आठ हजार 970 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अनुदानास पात्र ठरले. मात्र, अद्याप त्यांना वेतन अनुदान मंजूर झालेले नाही. त्यामुळे प्रचंड असंतोष आहे. डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात सरकार वेतन मंजूर करेल, अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, सरकारने दुर्लक्ष केल्याने येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनात तरतूद करावी, अशी मागणी मोते यांनी केली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 10 ते 15 वर्षे विनावेतन काम करत आहेत. मूल्यांकनाच्या निकषात पात्र होऊनही सहा महिन्यांचा कालावधी जातो. अद्याप निधी मंजूर होत नसेल, तर आणखी किती दिवस वाट पाहायची, असा सवाल बोरनारे यांनी केला. शिक्षकांच्या संयमाची परीक्षा न घेता सरकारने वेतन अनुदान त्वरित मंजूर करावे, असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्र

सोलापूर - लॉटरीने अनेकांना लखपती, करोडपती बनविले, त्याच लॉटरी तिकीट विक्रीच्या व्यवसायाचे भविष्य आता अंधकारमय झाले आहे. नव्याने...

01.51 AM

मुंबई - भारतीय नागरिक असलेल्या दांपत्याच्या घटस्फोटाच्या दाव्यावर सुनावणी घेण्याचा अधिकार दुबईतील न्यायालयाला नाही, असा...

12.30 AM

मुंबई - चित्रपट कामगारांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असे अखिल भारतीय कॉंग्रेस...

12.30 AM