उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पारा चाळिशी पार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

पुणे - राज्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस पडत असतानाच दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ होत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी पारा चाळिशीपार गेला आहे. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मालेगाव येथे उच्चांकी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवारपर्यंत (ता. १७) राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारनंतर तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Web Title: temperature increase in maharashtra