मंदिर समितीच्या सदस्याकडून कर्मचाऱ्यास शिवीगाळ

पंढरपूर - श्री विठ्ठल मंदिराच्या आतील सभामंडपात गुरुवारी आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी.
पंढरपूर - श्री विठ्ठल मंदिराच्या आतील सभामंडपात गुरुवारी आंदोलनात सहभागी झालेले कर्मचारी.

पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याने ओळखीच्या लोकांना वशिल्याने दर्शनाला सोडण्यास नकार दिल्याने संतापलेले मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांनी कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली. या घटनेमुळे मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले. हजारो भाविक दर्शनाच्या रांगेत उभे असताना अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे समितीचे काम ठप्प झाले होते. अधटराव यांनी दिलगिरी व्यक्त केल्यावर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

आषाढी यात्रेमुळे मंदिर समितीने "व्हीआयपी' दर्शन बंद केले आहे. अशाही परिस्थितीत काल (ता. 18) रात्री अधटराव यांनी त्यांच्या ओळखीच्या काही भाविकांना दर्शनाला सोडण्याचा आग्रह धरला होता. मात्र वरिष्ठांचा आदेश असल्याने वशिल्याने भाविकांना सोडता येणार नाही, असे कर्मचाऱ्याने त्यांना सांगितल्याने चिडलेल्या अधटराव यांनी कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली.

या घटनेची माहिती आज मंदिर समितीच्या अन्य कर्मचाऱ्यांना समजल्यावर सर्वांनी मंदिराच्या सभामंडपात येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना कळल्यावर यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी तातडीने प्रयत्न सुरू केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com