चौथ्या रांगेत बसावे लागले ही खंत!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जुलै 2016

मुंबई - मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेल्या एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत आक्रमक भाषण करत सर्व आरोपांचे खुलासे केले. त्यातच चाळीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात आज पहिल्यांदाच चौथ्या रांगेत बसावे लागले, याची खंत आहे. नेत्यांनी आरोप केले असते तरी एकवेळ मान्य केले असते; पण गल्लीतल्या लोकांनी केलेल्या आरोपांची दखल घेत सरकारने संवेदनशीलता दाखवल्याचा टोलाही त्यांनी हाणला. 

अत्यंत आक्रमक शैलीत खडसे यांनी आज आरोप करणाऱ्यांवर प्रतिहल्ला चढवला. पहिल्यांदा निवडून आलो तेव्हाही विधानसभेत चौथ्या बाकावर बसलो नव्हतो; पण चाळीस वर्षांनंतर अन्‌ सात वेळा निवडून आल्यावर आज केवळ बिनबुडाच्या आरोपामुळे चौथ्या बाकावर बसावे लागले. आरोप तर अनेकांवर आहेत. प्रत्येकाला आरोप झाले म्हणून कारवाई केली तर सर्व बाके रिकामी होतील, असा शालजोडीतला टोलाही त्यांनी हाणला. राजकारणात केवळ आरोपामुळे व मिडीय ट्रायलने एखाद्या राजकीय कारकिर्दीचा अंत होत असेल तर ही वेळ सर्वांवर येऊ शकते, असे खडसे म्हणाले. आजपर्यंत एकही पुरावा दमानिया काय, किंवा भंगाळे काय, कोणीही सादर करू शकले नाहीत; पण मी मात्र शिक्षा भोगतोय, अशा शब्दांत त्यांनी मन मोकळे केले. विरोधी पक्षाने भ्रष्टाचाराबाबतचा प्रस्ताव चर्चेला आणल्याचे आभार मानत, यामुळे मला बोलायची संधी तरी मिळाली. या अगोदर सर्वांना ओरडून सांगितले; पण कुणीही ऐकले नाही. त्यामुळं सागावं तरी कुणाला, हा प्रश्न होता. आता विधानसभेच्या माध्यमातून जनतेच्या समोर वस्तुस्थिती मांडण्याची संधी मिळवून दिल्याबाबत त्यांनी विरोधकांचे आभार मानले.
 
दुश्‍मन भी गैर खानदानी मिले
या वेळी आवेशात बोलताना खडसे यांनी
मैं ना तलवार से डरता हूँ ना खंजर से,
मेरी आशा थी की, दुश्‍मन भी मिले तो खानदानी मिले..!
मगर मेरी बदनसिबी थी की,
जो मिले, वो भी गैर खानदानी मिले..!!
असा शेर सुनावत "हितचिंतकां‘ंना चिमटे काढले.