दिल्ली संचलनासाठी तीन छात्रसैनिकांची निवड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

इचलकरंजी - प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी येथील दत्ताजीराव कदम एएससी कॉलेजच्या तीन एनसीसी छात्रांची निवड झाली. विजय कोपार्डे, पौर्णिमा वाघिरे व ताहिर मुल्ला यांची निवड झाली.

कोल्हापूर, औरंगाबाद व दिल्ली आदी ठिकाणी झालेल्या तेरा कॅंपमधून ही निवड झाली. एकूण 148 छात्रसैनिक संचलनात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये वरील तिघांचा समावेश आहे. सलग पाच वर्षे या संचलनात या महाविद्यालयाचे छात्रसैनिक सहभागी होत आहेत. या छात्र सैनिकांना 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर डॉ. साझी अब्राहम, ले. कर्नल अमित पूर्ती, प्राचार्य मिलिंद हुजरे यांचे सहकार्य मिळाले. तर प्रा. कॅप्टन मोहन वीरकर, सुभेदार मेजर जयवंत डावरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Three cadet selection for Delhi parade