नगरमध्ये स्वाइन फ्लूने आणखी तिघे दगावले 

नगरमध्ये स्वाइन फ्लूने आणखी तिघे दगावले 

नाशिक - जिल्हा सरकारी रुग्णालयात स्वाइन फ्लूमुळे उपनगरमधील एका महिलेचा; तर स्वाइन फ्लूसदृश तापाने दोघे असा तिघांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूने आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 

सरला अरुण विसपुते (52, रा. उपनगर) या महिलेस स्वाइन फ्लूची लागण झाली होती. त्यांना गेल्या गुरुवारी (ता.20) सायंकाळी 7 वाजता खासगी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात अत्यवस्थ स्थितीमध्ये हलविण्यात आले होते. त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले असताना, आज सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी स्वाइन फ्लू विशेष कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्या राजेंद्र श्रावण सिंग (55, रा. सिन्नर) यांचा स्वाइन फ्लूसदृश तापाने मृत्यू झाला. सिंग यांच्यावर काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आज दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. सखुबाई बन्सी सोनवणे (42, रा. चिंचवणे, ता. अकोले, जि. नगर) यांचा आज स्वाइन फ्लू सदृश तापाने मृत्यू झाला. त्यांना गेल्या मंगळवारी (ता.18) जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com