तीन वर्षांनंतर राष्ट्रपती पोलिस पदके प्रदान 

तीन वर्षांनंतर राष्ट्रपती पोलिस पदके प्रदान 

मुंबई - 2014 मधील प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींनी पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल जाहीर केलेली राष्ट्रपती पोलिस पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीची पोलिस पदके मंगळवारी पोलिस मुख्यालयात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत देण्यात आली. दरम्यानच्या काळात अनेक जण निवृत्त झाले आहेत. 

उल्लेखनीय सेवेबद्दल प्रभात रंजन, महासंचालक (न्यायिक व तांत्रिक - मुंबई), जनार्दन ठोकळ, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त (सशस्त्र पोलिस - नायगाव), दिलीप घाग, निवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक (विशेष शाखा, मुंबई) यांना राष्ट्रपती पोलिस पदक देऊन गौरवण्यात आले. 

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी डॉ. प्रज्ञा सरवदे, अप्पर पोलिस महासंचालक (प्रशासन), कृष्ण प्रकाश, विशेष महानिरीक्षक (व्ही.व्ही.आय.पी. सुरक्षा), प्रकाश मुत्याळ, विशेष महानिरीक्षक (राज्य राखीव पोलिस दल - नागपूर), यादवराव पाटील, दिवंगत उपअधीक्षक यांच्या पत्नी सुनीता पाटील (नगर), विलास जगदाळे, सेवानिवृत्त सहायक आयुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग - ठाणे शहर), रघुनाथ फुगे, वरिष्ठ निरीक्षक (पुणे शहर), काळुराम धांडेकर, निवृत्त निरीक्षक (सोलापूर शहर), पंडित राठोड, राखीव निरीक्षक (परभणी), ज्ञानेश्‍वर भूमकर, निवृत्त उपनिरीक्षक - मुंबई), आनंद चोरघे, निवृत्त उपनिरीक्षक (मुंबई), अरुण मोरे, निवृत्त उपनिरीक्षक (पुणे शहर), शामराव तुरंबेकर, निवृत्त उपनिरीक्षक (ठाणे ग्रामीण), रमेश वराडे, निवृत्त उपनिरीक्षक (नंदूरबार), विनोद अंबरकर, निवृत्त बिनतारी उपनिरीक्षक (नाशिक शहर), किशोर बोरसे, निवृत्त गुप्तवार्ता अधिकारी (मालेगाव), परशुराम राणे, उपनिरीक्षक (ठाणे शहर), पंढरीनाथ मरकंटे, दिवंगत सहायक उपनिरीक्षक यांच्या पत्नी प्रभावती मरकंटे, (परभणी), अर्जुन सुतार, निवृत्त सहायक उपनिरीक्षक (मुंबई), भानुदास कदम, निवृत्त सहायक उपनिरीक्षक (विशेष शाखा, मुंबई), मंचक बचाटे, निवृत्त सहायक उपनिरीक्षक (परभणी), प्रकाश सावंत, सहायक पोलिस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त), रा.रा.पो. बल, गट क्र.2, पुणे, नीना नारखेडे, निवृत्त सहायक उपनिरीक्षक (रा.रा.पो. बल, गट क्र. 13, नागपूर), सुरेश पाटील, सहायक उपनिरीक्षक (सोलापूर शहर), हेमंतकुमार पांडे, सहायक उपनिरीक्षक (नागपूर शहर), शंकर देवकर, सहायक उपनिरीक्षक (हिंगोली), काशिनाथ जाधव, सहायक उपनिरीक्षक (नंदुरबार), चंद्रकांत शिंदे, सहायक उपनिरीक्षक (सातारा), संभाजी कुंभार, सहायक उपनिरीक्षक (सांगली), मुश्‍ताक अली, सहायक उपनिरीक्षक (अकोला), दत्तात्रय जाधव, सहायक उपनिरीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई), राहुल सोनावणे, सहायक उपनिरीक्षक (रा.रा.पो. बल, गट क्र.1, पुणे), बब्रुवान माने, सहायक उपनिरीक्षक, (रा.रा.पो. बल, गट क्र.1, पुणे), उदय गावकर, सहायक उपनिरीक्षक (रा.रा.पो.बल, गट क्र.1, पुणे), डेव्हिड लोबो, सहायक उपनिरीक्षक (रा.रा.पो. बल, गट क्र.2, पुणे), अशोक भोगण, सहायक उपनिरीक्षक (रा.रा.पो. बल, गट क्र.2, पुणे), जयसिंग घाडगे, सहायक उपनिरीक्षक (रा.रा.पो. बल, गट क्र. 2, पुणे), सोपान गोल्हार, सहायक उपनिरीक्षक (रा.रा.पो. बल, गट क्र.5, दौंड), बाळकृष्ण देसाई, सहायक उपनिरीक्षक (रा.रा.पो. बल, गट क्र.7, दौंड), राजेंद्र अवताडे, सहायक उपनिरीक्षक (रा.रा.पो. बल, गट क्र.9, अमरावती), राजाराम सुर्वे, पोलिस हवालदार, (दहशतवादविरोधी पथक, पुणे) यांना राज्यपालांच्या हस्ते पोलिस पदक देऊन गौरवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com