पोटनिवडणुकीसाठी आज मतदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सहा महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. 6) मतदान होणार आहे. शनिवारी (ता. 7) मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी गुरुवारी दिली. 

मुंबई, नाशिक, सोलापूर, पुणे, अहमदनगर व उल्हासनगर महानगरपालिकेतील प्रत्येकी एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. शनिवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीस सुरवात होईल, असे ते म्हणाले. 

पोटनिवडणूक होणारे प्रभाग 
मुंबई (173) ः तीन उमेदवार रिंगणात, नाशिक (13-क) ः आठ उमेदवार रिंगणात, सोलापूर (14-क)- नऊ उमेदवार रिंगणात, पुणे-(22-क) ः पाच उमेदवार रिंगणात, अहमदनगर (32-ब) ः तीन उमेदवार रिंगणात, उल्हासनगर (17-ब) ः चार उमेदवार रिंगणात. 

Web Title: today maharashtra by-elections