"एमपीएससी'च्या परीक्षेला  दोन ओळखपत्रे बंधनकारक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई - राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा देताना प्रवेश प्रमाणपत्रासोबत परीक्षार्थीला आता इतर दोन ओळखपत्रे सोबत आणावी लागणार आहेत. बोगस परीक्षार्थींची वाढती प्रकरणे पाहता त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आयोगाना हा निर्णय घेतला आहे. यासाठी परीक्षार्थी उमेदवाराचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट (पारपत्र), पॅनकार्ड आणि स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतीही दोन ओळखपत्रे व त्यांची छायांकित प्रत सोबत आणणे आयोगाने बंधनकारक केले आहे. 

परीक्षार्थीने परीक्षेला येताना या ओळखपत्रांपैकी पुरावा सादर करणारी कोणतीही दोन ओळखपत्रे सोबत आणली नाहीत, तर त्यांना परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात येईल, अशी घोषणा आयोगाने केली आहे. याशिवाय, आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांकरता उमेदवारांनी परीक्षेच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा कक्षात हजर राहणे अनिवार्य असल्याचेही आयोगाने कळवले आहे. 

Web Title: Two identities are mandatory for the MPSC examination