"एटीएस'नेच दोन आरोपींना ठार केले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

मुंबई - मालेगाव बॉंबस्फोटातील फरारी आरोपी रामजी कलसंग्रा आणि रामजी डांगे यांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) यापूर्वीच ठार केले आहे. मुंबईवरील "26/11'च्या दहशतवादी हल्ल्यातील अनोळखी मृतदेह त्यांचेच होते, असा दावा आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितचे वकील श्रीकांत शिवदे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला. 

मुंबई - मालेगाव बॉंबस्फोटातील फरारी आरोपी रामजी कलसंग्रा आणि रामजी डांगे यांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) यापूर्वीच ठार केले आहे. मुंबईवरील "26/11'च्या दहशतवादी हल्ल्यातील अनोळखी मृतदेह त्यांचेच होते, असा दावा आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितचे वकील श्रीकांत शिवदे यांनी मंगळवारी उच्च न्यायालयात केला. 

आरोपी प्रसाद पुरोहित याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान शिवदे यांनी हा दावा केला. "26/11'च्या दहशतवादी हल्ल्यातील दोन मृतदेहांची ओळख पटली नव्हती. ते मृतदेह या दोघांचेच असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. या युक्तिवादावर राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) वकील संदेश पाटील यांनी आक्षेप घेतला. 

मुंबईतील "26/11'च्या दहशतवादी हल्ल्यातील अनोळखी मृतदेहांपैकी एकाचा मृत्यू डोक्‍याला गोळी लागल्याने; तर दुसऱ्याचा डोक्‍याला मार लागल्याने झाला, असे शिवदे यांनी न्यायालयात सांगितले. कर्नल पुरोहितने "आरडीएक्‍स' पुरवल्याचा कुठलाही ठोस पुरावा एटीएसकडे नसल्याचा दावाही त्यांनी केला. 

"एनआयए'ने या प्रकरणात आरोपपत्र दाखल करतानाही दुजाभाव केल्याचा आरोप पुरोहितच्या वकिलांनी केला. याच प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला निर्दोष ठरवण्यात आले आहे. मात्र, पुरोहितचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दर्शवण्यात आल्याचे शिवदे यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. या प्रकरणाचा तपास सुरवातीला एटीएसने केला आणि नंतर एनआयए करत आहे. दोन्ही तपास यंत्रणांच्या तपासात फरक कसा काय, असा सवालही पुरोहितच्या वकिलांनी उपस्थित केला. 

महाराष्ट्र

मुंबई - वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या घरकुलांसंदर्भात येत्या दोन महिन्यांत सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन...

03.39 AM

मुंबई - रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्यानंतर राज्य सरकारने आता राज्यभरातील...

03.03 AM

मुंबई - महागाई, तीन वर्षांतील विक्रमी पेट्रोल दरवाढ आणि घरगुती सिलिंडरची दरवाढ या प्रश्‍नांवर आवाज उठवत सत्ताधारी भाजपची कोंडी...

02.48 AM