उदयनराजे भोसले म्हणाले, ‘माविआ’चे हे अनैसर्गिक गठबंधन होतं...

Udayan Raje Bhosale said, "This is an unnatural alliance of Mavia
Udayan Raje Bhosale said, "This is an unnatural alliance of MaviaUdayan Raje Bhosale said, "This is an unnatural alliance of Mavia

मुंबई : मागील चार ते पाच दिवसांपासून राज्य सरकारमध्ये चांगलेच वादंग सुरू आहे. सरकार पडते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सरकारकडून महाविकास आघाडीचे (maha vikas aghadi) सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशात भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. महाविकास आघाडीचे हे अनैसर्गिक गठबंधन होते, ते टिकणारे नव्हते, असे उदयनराजे Udayan Raje Bhosale म्हणाले. (Udayan Raje Bhosale said, "This is an unnatural alliance of Mavia)

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊनच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले होते. निवडणुका घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी गठबंधन करण्यात आले. यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असे वाटत होते आणि तसेच झाले, असेही उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) म्हणाले.

Udayan Raje Bhosale said, "This is an unnatural alliance of Mavia
शिवसेना विधीमंडळ पक्षनेतेपदी अजय चौधरींच्या नियुक्तीला मंजुरी

प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. निवडून आलेल्या आमदारांना विचारून निर्णय घेतला असता तर हे गठबंधन झालेच नसते, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

भाजप (BJP) आणि शिवसेनेचे विरोधक काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आहे. मात्र, सत्ता स्थापन करण्यासाठी हे एकत्र आले. प्रत्येक पक्षाच्या निवडून आलेल्या आमदारांना याबद्दल विचारले असते तर हे गठबंधन झालेच नसते. हे अनैसर्गिक गठबंधन होतं ते टिकणारं नव्हतं. याची आधीपासूनच कल्पना होती आणि झालेही तसेच, असेही उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com