अपिलासाठी मुदत मागणारा उदयनराजेंचा अर्ज फेटाळला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

सातारा - अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत नाकारत खासदार उदयनराजे भोसले यांना दुसरा धक्का दिला आहे. 

सातारा - अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदत नाकारत खासदार उदयनराजे भोसले यांना दुसरा धक्का दिला आहे. 

लोणंद औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक राजेश जैन यांना खंडणीसाठी मारहाण केल्याप्रकरणी खासदार उदयनराजेंसह अन्य संशयितांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर उदयनराजे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केला होता. 23 मार्च रोजी न्यायालयने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश शिरसीकर यांनी सरकार पक्षाने मांडलेले म्हणणे ग्राह्य मानत मंगळवारी उदयनराजे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. त्यामुळे त्यांना अटक करण्याचा मार्ग पोलिसांसाठी मोकळा झाला होता. 

बुधवारी उदयनराजे यांच्या वतीने न्यायालयात आणखी एक अर्ज दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मुदत मिळावी, अशी मागणी त्या अर्जाद्वारे करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने तो अर्जही फेटाळला आहे.