मोदींचीही कुंडली तयार - उध्दव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017


कमळ नाही फक्त मळ
भाजपकडे आता कमळ नाही फक्त मळ राहीला आहे. आमच्याकडे तळमळ आहे. यांच्या मनात मळ आहे अशी खिल्लीही उध्दव ठाकरे यांनी उडवली. भाजप म्हणजे नाटकी कंपनी असून त्यांच्या सभांना होणारी गर्दीही पारदर्शक असल्याने रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत.

मुंबई - पंतप्रधान म्हणतात त्यांच्याकडे सर्वांचे कुंडल्या आहेत. पण,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही कुंडली तयारच आहे. असा टोला लगावतानाच पोलिसांच्या ब्लॅकलिस्ट मधील लोक भाजपच्या व्यासपिठावर येत आहेत. भाजपमध्ये वाढलेले गुंड बघूनच मुख्यंमत्र्यांनी मुंबईची तुलना पाटणाशी केली. मुंबईची आब्रु काढणाऱ्यांना जागेवर ठेवणार नाही असा हल्ला आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चढवला.

वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालय जवळ झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा भाजपलाच लक्ष केले. भाजप स्वत:चे काही करत नसून कॉंग्रेसने केलेली कामे होर्डींगवर दाखवत आहेत. युती तोडली तेच बरं झालं. नाहीतर कलानीच्या रांगेत माझाही फोटो लागला असता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कलानीचे फोटो एकत्र लागत आहेत. ते एकाच माळेची मणी आहेत. त्या माळेतला मी नाही. गुंड घेऊन आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न कराल तर खबरदार. हे पोलिस बाजूला ठेवा मग सैनिक काय ते दाखवू, असे आव्हानही उध्दव ठाकरे यांनी दिला.

खोटं बोलणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणे हे दुर्दव्य आहे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावतानाच त्यांच्या आरोपांवर त्यांच्यापक्षातून उत्तर मिळत आहे. भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनीच सांगितलं रस्ते घोटाळ्यात नगरसेवकांचा सहभाग नाही, तर तो अधिकारी आणि अभियंत्यांनी केला आहे. हे आयुक्त आणि अतिरीक्त आयुक्त राज्य सरकारनेच आणुन बसवले आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.

कमळ नाही फक्त मळ
भाजपकडे आता कमळ नाही फक्त मळ राहीला आहे. आमच्याकडे तळमळ आहे. यांच्या मनात मळ आहे अशी खिल्लीही उध्दव ठाकरे यांनी उडवली. भाजप म्हणजे नाटकी कंपनी असून त्यांच्या सभांना होणारी गर्दीही पारदर्शक असल्याने रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत.

Web Title: Uddhav Thackeray criticize Narendra Modi