संपत्तीचा चेंडू आता मातोश्रीच्या कोर्टात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई -  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची संपत्ती आम्ही जनतेसमोर आणत आहोत, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली संपत्ती- मालमत्ता जाहीर करावी, असे प्रतिआव्हान भाजपने गुरुवारी दिले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणाऱ्या उमेदवारांना आपली स्थावर आणि जंगम मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर करण्याची सक्ती असते. भाजप आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आपली संपत्ती जाहीर करण्याचे आव्हान एकमेकांच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. अमित शहा यांची संपत्ती जाहीर केल्याचे सांगत भाजपने चेंडू आता मातोश्रीच्या कोर्टात ढकलला आहे. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना- भाजपमधील आरोप- प्रत्यारोपांचा कलगीतुरा अनेक मुद्द्यांवरून सुरू असताना, कोणाकडे बेहिशेबी मालमत्ता आहे, यावरून वेगळी चर्चा रंगली. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी या वादाची ठिणगी टाकली होती. मुंबई महापालिकेतील माफिया राज संपविण्यासाठी भाजपची सत्ता आणावी, असे आवाहन जनतेला करतानाच, या माफियांना पाठिशी घालणारे "बॉस' म्हणून मातोश्रीकडे इशारा केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर करून पारदर्शी कारभाराचा आदर्श घालावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली होती. यावर शिवसेना पक्षप्रमुखांवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी अमित शहा यांची किती मालमत्ता आहे, हे आधी सांगावे, असा पलटवार शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. 

शिवसेनेचे आव्हान स्वीकारत गुरुवारी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी अमित शहा यांनी संपत्तीचा तपशील जाहीर केला असल्याचे स्पष्ट केले. शहा हे गुजरात विधानसभेचे सदस्य असून 2012 मध्ये निवडणूक लढविताना गुजरात आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची प्रत त्यांनी दिली आहे. 2007 मध्ये गुजरात विधानसभेचे सदस्य असताना शहा यांनी पाच कोटी 57 लाख 23 हजार 561 रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून संपत्ती जाहीर करताना पाच कोटी 14 लाख 73 हजार 126 रुपये रोख रक्कम असल्याचे त्यांनी नमूद केले; तर शेती आणि बिनशेती, व्यापारी संकुल आदी सहा कोटी 62 लाख 95 हजार 626 रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी गुजरातचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांच्या संपत्तीची माहिती देत आहोत. आता उद्वव ठाकरे यांनी आपली संपत्ती जाहीर करावी, अशी मागणीही भंडारी यांनी या वेळी केली. 

महाराष्ट्र

केंद्र सरकारकडे सात वर्षांत अडीच हजार कोटींची थकबाकी मुंबई - मराठा...

04.39 AM

मुंबई - मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीला...

04.21 AM

मुंबई : आजच्या बैठकीत फक्त संघटनात्मक चर्चा होईल. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा तुम्हाला अपेक्षित असलेली चर्चा आजच्या बैठकीत...

गुरुवार, 17 ऑगस्ट 2017