लोकांच्या बँक लॉकर्स वर नजर ठेवणार का?- उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मुंबई- मोदी सरकारने 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. मोदी सरकार आता घरागऱात कॅमेरे लावणार का? 56 इंचाची छाती 5600 इंच करा पण हिम्मत असेल तर स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक आणि तिथला काळा पैसा भारतात आणून दाखवा, असेही ठाकरे म्हणाले.

मुंबई- मोदी सरकारने 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली. मोदी सरकार आता घरागऱात कॅमेरे लावणार का? 56 इंचाची छाती 5600 इंच करा पण हिम्मत असेल तर स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक आणि तिथला काळा पैसा भारतात आणून दाखवा, असेही ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे-
- दिवाळीला ज्या लक्ष्मीचे पुजन केले आता ती लक्ष्मीच राहिली नाही.
- मोदींनी मन की बात करण्याऐवजी धन की बात केली पण जन की बात केली नाही.
- देशातून काळा पैसा हद्दपार करावा या योजनेला माझा विरोध नाही.
- मोदींनी सर्जीकल स्ट्राईक केला होता. ते धाडसी पाऊल होते. पण आता काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदींनी जो धाडसी निर्णय घेतला आहे तो आता अंगाशी येतोय असे वाटतंय.
- मोरारजी देसाई यांनी देखील असा निर्णय घेतला होता पण त्याचे काय झाले आपल्याला माहिती आहे.
- आज एटीएमच्या बाहेर रांगा आहेत
- मुलुंड-ठाण्यात बँकेच्या बाहेरील रांगेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला याला जबाबदार कोण?
- त्या व्यक्तीच्या मृत्यूला ज्या व्यक्तीने ही निर्णय जाहिर केला तो व्यक्ती जबाबदार.
- विविध ठिकाणी लग्न रद्द झाली आहेत.
- रूग्णालयात अडचणी येत आहेत.
- आता घराघरात कॅमेरे लावणार का?
- लोकांच्या बँक लॉकर्स वर नजर ठेवणार का?
- घरोघरी मोदींचा फोटो लावा. हाच एक चांगला नागरिक आहे.
- आज सामन्य नागरिकांना त्रास होतोय त्या सामान्य नागरिकांनी आपल्याला निवडून दिले आहे हे विसरू नका.
- जनता पुढील निवडणुकीत धडा शिकवेल.
- जनता सर्जिकल स्ट्राईक करेल हे लक्षात ठेवा.
- 56 इंचाची छाती 5600 इंच करा पण हिम्मत असेल तर स्विस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक आणि तिथला काळा पैसा भारतात आणून दाखवा.
- सामान्य माणसाला त्रास देण्याऐवजी जिथे काळ्या पैशाचा उगम आहे तिथे कारवाई करा.
- सामान्य नागरिकांना होणारा त्रास बंद झालाच पाहिजे.
- ज्या जनतेच्या भल्यासाठी तुम्ही काम करताय असं दाखवताय त्या जनतेला त्रास का देताय?
- हा त्रास संपला नाही तर जनता जनतेचा अधिकार वापरेल.

Web Title: uddhav thackeray slapped on narendra modi